लोक अनेक वेळा सुट्टी घेण्यासाठी आजारी असल्याचं कारण सांगतात. हे कारण खरे असते की खोटे याबाबतचा तपास अनेकवेळा केला जात नाही. काही लोक खोटं कारण सांगून रजा घेतात. अशीच एक घटना अमेरिकेमध्ये(America) घडली आहे. अमेरिकेतील एका महिलेने कोरोना झाल्याचं खोटं कारण सांगून कामावरून सुट्टी घेतली.(The boss fired the woman who lied)
या महिलेचं नाव एली मिडलेटन असं आहे. एली मिडलेटनने टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. एलिनने टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, ‘कोरोनाची लागण झाल्याचं खोटं कारण देऊन मी सुट्टी घेतली होती.’ एली सुट्टी घेतल्यानंतर मित्र मैत्रीणींसोबत पार्टी करायला गेली.
एली पार्टीला गेल्याचे तिच्या बॉसला कळाले. एलीच्या बॉसने तिला मेसेज केला. त्या मेसेजमध्ये,’तू कुठे आहेस?’ असे बॉसने लिहले होते. तसेच एलीच्या बॉसने या मेसेजसोबतचा एक स्क्रीनशॉटही पाठवला होता. हा मेसेज पाहिल्यानंतर एलीने परत खोटी कारणे द्यायला सुरवात केली. यावर एलीच्या बॉसने तिला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला.
ही संपूर्ण घटना एली मिडलेटनने एका व्हिडिओमध्ये शूट केली आहे. हा व्हिडिओ एलीने टिकटॉकवर शेअर केला आहे. कोरोना झाल्याचं खोटं कारण दिल्यामुळे मला नोकरीवरून काढण्यात आलं, असे एली मिडलेटनने टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितल आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
काही लोक पोटदुखी, डोकेदुखी किंवा इतर काही आजारांचं कारण सांगून कंपनीतून सुट्टी घेतात. कंपनीकडून सुट्टीचे कारण खरे आहे की खोटे याचा कोणताही तपास केला जात नाही. त्यामुळे कंपनीतील कर्मचारी या गोष्टीचा चुकीचा फायदा घेत खोटी कारणं सांगतात. कंपनीही प्रकृतीच्या कारणामुळे कर्मचाऱ्यांना रजा देते.
पण अमेरिकेतील एली मिडलेटने कोरोनाचे खोटं कारण देत ऑफिसमधून सुट्टी घेतली. पण बॉसला एली खोटं बोलत असल्याची माहिती मिळाली. यावर बॉसने एलीला कामावरून काढून टाकले. याबाबतची माहिती स्वतः एलीने सांगितली आहे. त्यामुळे आता या कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना सुट्टी घेताना अनेकदा विचार करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: लहान भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने दाखवले धाडस; IPS म्हणाले, ‘भाऊ असावा तर असा’
आमिर खान किरण राव पुन्हा येणार एकत्र? दोघांचा एकमेकांना मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल
जगातील सगळ्यात खतरनाक गुप्तहेरीचे सॉफ्टवेअर आहे पेगासस, वाचा या सॉफ्टवेअरची पुर्ण कहाणी