अंधश्रद्धेला अजूनही काही ठिकाणी खातं – पाणी घातलं जातं असल्याचं पाहायला मिळत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक धक्कादायक प्रकार घडतं असल्याचं पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मांत्रिकांकडून होणाऱ्या अत्याचारांचे देखील प्रमाण वाढले असल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र असं असलं तरी देखील अनेकदा मांत्रिकांच्या भूलथापांना महिला बळी पडताना पाहायला मिळत आहे. यातून अनेक धक्कादायक प्रकार घडतं असल्याचं पाहायला मिळतं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
हे भयानक प्रकरण वाचून तुमच्या देखील पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. हे प्रकरण भोपाळ मधील खंडवा जिल्ह्यातील आहे. एक शिक्षिका (30) सन 2019 पासून त्वचेच्या समस्येने त्रस्त होती. डॉक्टरांच्या औषधांचा काहीही परिणाम होत नसल्याने शिक्षिका कथित तांत्रिकाच्या भूलथापांना बळी पडली.
अन् एक धक्कादायक प्रकार या घटनेतून घडला. पीडित महिलेला तिच्या मित्राने सांगितल की, शशिकांत एक मोठा बाबा आहे. तो तांत्रिक कृतीने तुझा त्रास दूर करेल. त्यानंतर तात्काळ पीडित महिला ती शशिकांतला भेटायला घरी गेली. मांत्रिकाने सांगितल की तुझ्या घरात भूत आहे.
त्यानंतर पीडित महिला घाबरली. त्यानंतर त्या मांत्रिकाने काही मंत्र वाचले, मात्र प्रश्न सुटला नाही. त्यानंतर तो म्हणाला, तुझ्या अंगात जिन आहे, त्याला हाकलण्यासाठी शारीरिक संबंध करावे लागतील. असं सांगून तांत्रिकाने अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप पीडित महिलेने केला आहे.
अखेर या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना संपूर्ण प्रकरण सांगितलं. पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. याबाबत सीएसपी पूनम चंद यादव यांनी सांगितले की, आरोपी तांत्रिक हा चिरा खान येथील रहिवासी असून तो व्यवसायाने प्लंबर आहे.
महत्वाच्या बातम्या-
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…