उत्तर प्रदेशातील आसाराम बापूच्या आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब समजल्यानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे. गाडीत सापडलेल्या मृतदेहाला पोलिसांनी पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहे. तसेच या घटनेमुळे आश्रमाविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्हातील आसाराम बापूच्या आश्रमामध्ये एक कार अनेक दिवसांपासून उभी होती. गेल्या दोन दिवसापासून या कारमधून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आश्रमातील वॉचमनने कार उघडून पाहिली. यावेळी कारमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. यानंतर वॉचमनने त्वरीत पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या तपासातून ही तरुणी चार दिवसापूर्वी घरातून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. कित्येक दिवस या तरुणीचा मृतदेह कारमध्येच पडून होता. दुर्गंधी पसरल्यामुळे मृतदेह कारमध्ये असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आश्रमातील व्यक्तींना चौकशीसाठी बोलावून घेतले आहे.
तसेच घटनास्थळावर आलेल्या पोलिसांनी कार आणि आश्रमाला सील केले. आता तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर इतर गोष्टींचा उलगडा होणार आहे. अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही. परंतु सांगण्यात येत आहे की, गेल्या तीन वर्षांपूर्वी तरुणीचे वडिलही असेच अचानकपणे गायब झाले होते.
शेवट पर्यंत त्यांच्याविषयी कोणतीच माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. सध्या आसाराम बापू बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. त्यांच्या समोरील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच त्याच्याच एका आश्रम मधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी आश्रमावर संशय व्यक्त करत पुढील तपास सुरु ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या
“या सगळ्यांशी माझी नाळ जुळलीय, आता मी यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे का?”
‘शरद पवारांनी 120 कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं’; एसटी कर्मचाऱ्यांचा खळबळजनक आरोप
राजकीय नेत्यानंतर आता अतिश्रीमंत शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर, ‘या’ गोष्टींची होणार चौकशी
शरद पवारांच्या घरावर हल्ला करणार एसटी कर्मचारी दारू पिलेले होते; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट