Share

लग्न काही दिवसांवर आले असतानाच झाला घात, दोघे हॉटेलमध्ये आले आणि…, ‘ते’ दृश पाहून पोलिसही चक्रावले

Crime

लग्न काही दिवसांवर आले होते.. लग्नाची लगबग सुरू होती… सुखी संसाराची सुरुवात लवकरच होणार होती, अन् घात झाला. हॉटेलमध्ये तरुणीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.

मुंबई जवळील वसईमधील (vasai) एका हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. सायली शहाणे असं या मृत तरुणीचे नाव आहे. रविवारी सायली ही आपला मित्र सागर नाईक सोबत दुपारी हॉटेलमध्ये आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे लग्न काही दिवसांवर आले होते.

रविवारी हे दोघे वसई पश्चिम येथील स्टेटस हॉटेलमध्ये गेले होते. सकाळी रूममधून कुणीही बाहेर आलं नाही. हॉटेलमधील कर्मचारी रूम साफ करण्यासाठी सकाळी रुमचा दरवाजा वाजवला पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा सायलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायलीच्या मानेला आणि डोक्यावर मार लागल्याचे आढळून आले आहे. तसेच सायली सोबत आलेला मित्र सागर मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे लग्न ठरवलेल होतं. लग्नाची तारीख देखील जवळ आली होती. मात्र अचानक तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे तरुणीसोबत आलेला मित्र सागर बेपत्ता झाल्याने या प्रकरणातील गुंता आधीच वाढला असून पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

दरम्यान, विरारमध्ये शनिवारीच गोळीबाराची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच हॉटेलमध्ये तरुणीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे विरारमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
रशियाला वाकूल्या दाखवत युक्रेनचा नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज; युद्धाला वेगळे वळन
PUBG मध्ये वारंवार जिंकायचा म्हणून तिघांनी मिळून साहिलचा केला खून, ठाण्यातील धक्कादायक घटना
शेतकऱ्याच्या झोपडीला आग; आयुष्यभर कष्टाने जमवलेली लाखो रूपयांची रोकड डोळ्यादेखत जळाली
भाजप खासदारावर कार्यकर्त्यानेच केले कोट्यावधींच्या फसवणूकीचे आरोप; वाचा पुर्ण प्रकरण…

इतर क्राईम राज्य

Join WhatsApp

Join Now