Share

धक्कादायक! आसाराम बापूंच्या ‘या’ आश्रमात कारमध्ये सापडला मुलीचा मृतदेह, ३ वर्षांपासून होती बेपत्ता

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथील आसाराम बापूंच्या (Asaram Bapu) आश्रमात उभ्या असलेल्या कारमधून मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली असून घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.(The body of a girl was found in a car at Asaram Bapu’s ashram)

असे सांगितले जात आहे की ही मुलगी 4 दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती, तिचा मृतदेह आसाराम बापूंच्या आश्रमात अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमध्ये सापडला आहे. कारमधून दुर्गंधी येत असल्याचे पाहून आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी कार उघडली असता, त्यात मृतदेह आढळून आला, त्यानंतर कर्मचाऱ्यानी पोलिसांना याची माहिती दिली आली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कारशिवाय संपूर्ण आश्रम सील करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात खून करून मृतदेह लपवून ठेवल्याचा अंदाज आहे. ही घटना नगर कोतवाली भागातील बिमौर गावात असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमातील आहे, जिथे ही कार गेल्या अनेक दिवसांपासून उभी होती.

पोलिसांनी सांगितले की, आश्रमाच्या चौकीदाराने कारमधून दुर्गंधी येत असल्याने कार उघडली, तेव्हा त्याला आत मृतदेह आढळून आला, त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कार आणि आश्रम सील केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम आश्रम आणि वाहनाची चौकशी करत आहेत.

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नगर कोतवाली परिसरातील ग्रामपंचायत बिमौर येथील रहिवासी असलेले मनोज कुमार यांची पंधरा वर्षीय मुलगी खुशी पांडे ही मंगळवारपासून घरातून बेपत्ता होती. बराच शोध घेऊनही तिचा शोध न लागल्याने कुटुंबीयांनी गुरुवारी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. शुक्रवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी आश्रमातून मृतदेह बाहेर काढल्याचे सांगण्यात येत आहे. नगर कोतवाल पंकज सिंह यांनी सांगितले की, मृतदेह खूप जुना दिसत होता.

मृतदेह सापडल्यानंतर पोलीस आश्रमातील अनेकांची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर मृतदेह सापडलेल्या कारबाबतही पोलीस तपास करत आहेत. पोलिस आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी करत आहेत. मुलीचे वडीलही गेल्या तीन वर्षांपासून गूढपणे बेपत्ता झाले होते. त्यांचाही तपास पोलीस करत आहेत. सध्या आश्रमाला कुलूप लावण्यात आले आहे. आश्रमात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

महत्वाच्या बातम्या-
आसाराम बापू निर्दोष आहेत त्यांची सुटका करा; महिलादिनी नांदेडमधील महीलांनी काढला मोर्चा
निधनानंतरही हेळसांडच! 4 महिलांनी 5 KM खांद्यावर नेला वृद्धेचा मृतदेह; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पहा
काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पहा; ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; खांद्यावर मृतदेह ठेवून बाप १० किमी चालला
पुतीन यांना मनोरुग्ण म्हणणाऱ्या मॉडेलचा मृतदेह आढळला सुटकेसमध्ये, आरोपीने केले धक्कादायक खुलासे

 

 

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now