महाविकास आघाडीच्या नेत्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्यांची जनतेत कसलीच इज्जत राहिली नाही. ईडीची इज्जत गावातल्या गणेश बिडी एवढीसुद्धा राहिली नाही, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. उस्मानाबादमधील पडोळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पक्ष मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.(The BJP is not over yet, they need to be rehabilitated)
धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना मोदी सरकार आणि तपास यंत्रणांवर चांगलीचं टीका केली आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, सव्वा दोन वर्षापुर्वी ‘होत्याचे नव्हत, व नव्हत्याचे होतं’ झालं. २०१९ चा निकाल आठवतो संध्याकाळी चित्र स्पष्ट झाले, पक्षाचे आकडे आपण पाहत होतो. पण काहीच दिवसात होत्याचे नव्हत व नव्हत्याचे होते झाले हे सगळ शरद पवार यांनी करुन दाखविलं.
माजी मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगूनही त्यांनी ऐकले नाही. पवार साहेबांचा नाद करू नका, पण त्यांनी केला आणि पुढे काय झाले हे तुमच्यासमोरच आहे, असे सांगत मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपची जिरवण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हणलं आहे. या भारतीय जनता पक्षाच्या अंगातील माज अजून गेला नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
भल्यां-भल्यांच्या मागे तपासयंत्रणेचा ससेमिरा लावला जात आहे, ईडीची तर किंमत गावातल्या गणेश बिडीपेक्षा कमी झाली आहे. लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत. राज्याच्या महत्वाच्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने आपल्या महापुरुषावर केलेल्या वक्तव्ये आपण कसे सहन करणार? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणारी वक्तव्य आता जनता सहन करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य उभे केले आहे. ते राज्य त्यांच्या नावाचे कधीच नव्हते. ते रयतेचे राज्य आहे. हे राज्य अठरापगड जातीचे आहे. अशाप्रकारे शरद पवार यांनी अठरा पगड जातीतल्या लोकांना संधी दिली आहे. माझ्यासारख्या पडेल उमेद्वाराला विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली नसती. तर आज हा धनंजय मुंडे तुमच्यासमोर उभा दिसला नसता, असे कृतज्ञपणे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेच २५ आमदार नाराज; ‘या’ कारणावरून आपल्याच सरकारविरोधात थोपटले दंड
माझ्यासारख्या पडेल उमेदवाराला पवार साहेबांनी विरोधी पक्षनेता बनवले – धनंजय मुंडे