अपघात(Accident): सध्यस्थितीमध्ये अपघाताचे प्रमाण भरपूर वाढले आहे. काही तरुण वर्गाच्या अतिघाईमुळे तर काही पावसामुळे. अशीच अपघाताची घटना पुणे जिल्ह्यातील मावळ येथे घडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुण चुकीच्या लेन मध्ये गेला. समोरून भरधाव वेगाने कार आली व हा अपघात घडला.
ही संपूर्ण घटना कारच्या फ्रंट कॅमेरात कैद झाली आहे. बाळू गेनू शिळवणे असे दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्याकडे हिरोहोंडा बाईक होती. बाईक रस्त्याच्या कडेवरून डाव्या लेन मध्ये आणण्याच्या प्रयत्न दुचाकी चालक करीत होता. परंतु, समोरून येणाऱ्या कारच्या वेगाचा अंदाज त्याला लागला नाही व उजव्या बाजूला दुचाकीचा कारला धक्का लागला.
https://twitter.com/ssidsawant/status/1561547417543389184?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1561547417543389184%7Ctwgr%5Ed95d94f512d10998cc6e090a0d4996c0baf74bed%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fcrime%2Fpune-crime%2Fpune-maval-deadly-bike-accident-caught-in-front-camera-of-speeding-car-fortunately-bike-rider-survived-watch-video-au136-788599.html
तरुण गाडी घसरल्याने जागीच कोसळला. तळेगाव चाकण रोडवर हा अपघात घडला. दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पावसामुळे रस्त्यात चिखल झाला. त्यामुळे तरुणाच्या बाईकचे टायर घसरून तरुण खाली कोसळला. तरुणाला खरचटले आणि जखमी झाला. सुदैवाने तरुण वाचला. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यात स्पष्ट दिसत आहे की, तरुण कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत होता. कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यातून लक्षात येत आहे की, अपघात घडण्याला कारण वाहनचालकाचा बेशिस्तपणा आहे. या अपघाताने दुचाकीस्वाराचा बेशिस्तपणा आणि अतिउत्साह जीवावर बेतला असता, हे स्पष्ट होत आहे.
दुचाकी चालक कारच्या खाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू होऊ शकला असता परंतु सुदैवाने तो वाचला. या काळजाचे ठोके चुकवणाऱ्या व्हिडीओमध्ये रस्ते अपघातांची दाहकता दिसून येत आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाचा जीव जाण्याची शक्यता होती. वाहतुकीच्या नियमामध्ये सांगितल्याप्रमाणे, दुसऱ्या वाहनांना ओव्हर टेकिंग करणे हा गुन्हा समजल्या जातो.
पुढे जात असलेल्या वाहनाचे संकेत मिळाल्यावरच त्या वाहनाच्या उजव्या बाजूने निघावे. चुकूनही चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणे हानिकारक ठरू शकते. ओव्हरटेक करताना हे लक्षात ठेवा की, समोरून कोणतेही वाहन येताना दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
Chief Minister: …त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुलीने थेट डॉक्टरांनाच केली मारहाण, नंतर मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
Rakesh Jhunjunwala: राकेश झुनझुनवालांचा गुंतवणूकीचा ‘हा’ सल्ला सर्वांनी ऐकलाच पाहीजे; आनंद महिंद्राचे आवाहन
Idi Amin: या तानाशाहने भारतीयांना देशातून हुसकावून लावलं होतं, म्हणाला, अल्लाहचा आदेश आहे की..
Idi Amin: या तानाशाहने भारतीयांना देशातून हुसकावून लावलं होतं, म्हणाला, अल्लाहचा आदेश आहे की..