स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये “आई कुठे काय करते” ही मालिका सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. परंतु सध्या या मालिकेत चढउतार पाहिला मिळत आहेत. मुख्य म्हणजे मालिकेत अरुंधती आणि आशितोषच्या नात्याने वेगळे वळण घेतले आहे. अरुंधतीच्या आयुष्यात कॉलेज मित्र बनून आलेल्या आशुतोष देशमुखने सर्व कुटुंबासोबत आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे.
आशुतोषने आपल्या प्रेमाचा खुलासा संपूर्ण कुटुंबासमोर केला आहे. त्यामुळे आता कुटुंबात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. आशुतोषचे अरुंधतीवरचे प्रेम अनिरुधला खपत नसल्यामुळे त्याने आशुतोषला चांगलेच सुनावले आहे. तर यावेळेस आशुतोषही शांत बसलेला नाही.
गेल्या कित्येक वर्षापासून तु अरुंधतीला स्वतंत्र दिल नसल्याचा आरोप आशुतोषने लावला आहे. तर यामध्ये अरुंधतीने आशुतोषसोबत मैत्रीचेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अनिरुद्ध कसा ही असला तरी त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही असे अरुंधतीने म्हणले आहे.
दुसऱ्या बाजुला आशुतोषचे प्रेम समोर आल्यामुळे यशने अरुंधतीला पाठिंबा दिला आहे. आईला पुर्ण स्वतंत्र असल्याचे यशने मत व्यक्त केले आहे. अभी आणि अनघामध्ये ही अरुंधतीवरून वाद निर्माण झाले आहेत.
अभीच्या मते, आईने बाबांसारखेच पाऊल उचलू नये. ते चुकीचे वागले आहेत हे मान्य आहे. परंतु आईने ही तेच करू नये. समाज नावे ठेवेल. असे अभीचे म्हणणे आहे. परंतु अरुंधतीला ही प्रेमाची गरज आहे. एका काळात तीला ही कोणाची तरी साथ हवी असेल. समाजाचा काय विचार करायचा, असे अनघाला वाटते.
या दोघांच्यात सुरू झालेल्या वादामुळे अरुंधती आणि अशितोषला टेन्शन आले आहे. मालिकेत लवकरच यशच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. त्या अगोदरच मालिका एका नव्या वळणावर येऊन पोहचली आहे. आता पुढे जाऊन अरुंधती आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे. प्रेक्षक देखील अरुंधतीचे नवीन आयुष्य पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या
सुख म्हणजे नक्की काय असतं: आरोप करणाऱ्या शालिनी-देवकीला गौरीने थेट दिली धमकी; म्हणाली…
समंथा ठरली साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री; मानधन ऐकून डोळे पांढरे होतील
IPL 2022: लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सला केले टाटा-बाय; आता ‘या’ संघाला गोलंदाजी शिकवणार