Share

Shiv Sena : बड्या शिवसेना नेत्याला मोदी सरकारचा मोठा धक्का, पुर्णपणे जमीनदोस्त होणार…

pm modi

Shiv Sena: शिवसेना नेते अनिल परब यांचं मध्यंतरी एका गैरव्यवहारात नाव चर्चेत आलं. त्या संदर्भात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. संबंधित गैरव्यवहार प्रकरणात रत्नागिरी येथील दापोलीमधल्या २ रिसॉर्टवर कारवाई केली जाणार आहे. रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याची शिफारस तपास करणाऱ्या समितीने केंद्रीय पर्यावरण खात्याकडे केल्याचे समजते.

अनिल परब यांनी या रिसॉर्टची मालकी नाकारली असली तरी त्याबाबत चौकशी सुरू होती. पर्यावरण मंत्रालयाकडून आता ते दोन रिसॉर्ट्स पाडले जाणार असल्याचे दिसते. एवढेच नाही तर त्यानंतर संबंधितांकडून ६३ लाखांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

अधिक माहितीनुसार, किरीट सोमय्या यांनी रिसॉर्ट गैरव्यवहारबाबत गंभीर आरोप केले. त्यानंतर चर्चेत आलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणाबाबत आता पर्यावरण मंत्रालयाकडून मोठी कारवाई होत आहे. हे रिसॉर्ट जमीनदोस्त केले जाणार असल्याचे बोलले जाते.

या ठिकाणी नो डेव्हलपमेंट झोनमध्ये रिसॉर्टचे बांधकाम आहे. त्यामुळे जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जमिनीवरील बांधकाम पूर्णपणे तोडून ती जागा पूर्ववत केली जाणार आहे.

बांधकाम पाडण्यासाठी, पुनर्संचयित करण्यासाठी स्वतंत्र खर्च वसूल केला जाईल. त्यासंदर्भात आकारल्या जाणाऱ्या दंडाची रक्कम योग्य आहे की नाही. याबाबत समितीने आपल्या शिफारशी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवल्याचे सांगितले आहे.

आधी संजय नार्वेकरांचा बंगला पाडला. आता अनिल परबांशी संबंधित रिसॉर्ट जमीनदोस्त केली जाणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी नक्की पुढे कोण दोषी आढळते? व केंद्रीय पर्यावरण विभाग त्यावर कोणती कारवाई करते? हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र सध्या अनिल परबांचे रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणी नाव चर्चा असल्याने ते अडचणीत सापडले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
ISIS च्या दहशतवाद्याला भाजपच्या ‘या’ नेत्याची हत्या करून घ्यायचा होता बदला; काय आहे नेमकं प्रकरण वाचा
Amit Shah : अमित शहांच्या आरोपाने बॉलिवूडमध्ये खळबळ; म्हणाले, काही निर्माते, दिग्दर्शक पोलिसांची…
Farmer : मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर बोलत होते, तेवढ्यात शेतकऱ्याने मंत्रालयाबाहेर स्वत:ला घेतले पेटवून

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now