सध्या बॉलिवूडमध्ये ‘भूल भुलैया 2’ची चर्चा जोरात सुरू आहे. हा चित्रपट दररोज कमाईचे नवनवे रेकॉर्ड मोडत आहे. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. पण आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एक मोठे रहस्य सांगणार आहोत. आम्ही सांगणार आहोत, मंजुलिकाची खरी कहाणी आणि ही कथा कशी सस्पेन्स करून लोकांसमोर मांडली आहे.(the-big-secret-of-bhool-bhulaiya-2-has-come-to-light-if-you-are-going-to-watch-a-movie)
‘भूल भुलैया 2′(Bhool Bhulaiya 2) एक हॉरर कॉमेडी आहे. ज्यामध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, तब्बू आदी मुख्य भूमिकेत दिसले होते. कार्तिक आर्यन चित्रपटाचा हिरो आणि कियारा अडवाणी हिरोईन, तर खलनायक कोण? मंजुलिका नावाचं भूत? नाही, ही कथा पूर्णपणे ट्विस्ट आहे.
यावेळी तब्बू चित्रपटात विलेनच्या भूमिकेत दिसत आहे, जी काळ्या जादूमध्ये पारंगत आहे आणि ती खरी मंजुलिका आहे. आता तुम्हाला वाटेल की मंजुलिका ही भूत आहे, मग ती जादू-टोना कशी करते. तर जी भूत बनली आहे तिचे नाव अंजुलिका आहे आणि बाहेर जादू-टोना करणारीचे नाव मंजुलिका आहे.
या दोघी जुळ्या बहिणी आहेत पण मंजुलिकाने(Manjulika) अंजुलिकाला जादूटोणा करून मारले आणि आता मंजुलिकाकडून तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अंजुलिका आपल्या बहिणीकडे आली आहे. एकूणच या चित्रपटाचा विलेन म्हणजे तब्बू, जिची बहीण तिला उद्ध्वस्त करायला आली आहे.
‘भूल भुलैया 2’ ने सोमवारी, 30 मे रोजी बॉक्स ऑफिसवर(Box office) 11 दिवस पूर्ण केले. दुसऱ्या सोमवारी, चित्रपटाने 5.55 कोटींचे कलेक्शन केले, यासह 11 दिवसांचे चित्रपटाचे निव्वळ कलेक्शन आता 128 कोटींवर गेले आहे. ‘भूल भुलैया 2’साठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे, कारण ‘पृथ्वीराज’ या आठवड्यात 3 जूनपासून बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे, जो देशभरातील 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.