politics : शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यावरून मोठी रस्सीखेच मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतेय. आता याचप्रकारे कल्याणमध्ये असणाऱ्या दुर्गाडी गडावरील नवरात्र उत्सवावर पण शिंदे- ठाकरे वादाचा परिणाम होणार असल्याचे दिसते आहे. दुर्गाडी गडावर देवीचा उत्सव साजरा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
दसरा मेळाव्याबाबत पण दोन्ही गटांनी स्वतंत्र अर्ज मुंबई महापालिकेत केला होता. त्यावर ठोस निर्णय येणे बाकी आहे. तेच नवरात्र उत्सवाबाबत पण नव्या वादाला तोंड फुटले आहे. मागील ५४ वर्षांपासून दुर्गाडी गडावर शिवसेनेकडून देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. मात्र यावेळी ५५ वे वर्ष चांगलेच शिवसेनेच्या वादामुळे चांगलेच गाजणार असल्याचे दिसते.
दोन्ही गटाकडून जो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे. मात्र यावर शिवसेनेचे सचिन बसरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, असं बसरे म्हणाले.
मागच्या ५४ वर्षांपासून शिवसेना दुर्गाडी गडावर नवरात्र उत्सव साजरा करते. मग आताच शिवसेनेला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी न देता इतरांना कशी काय दिली? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. आता नवरात्र उत्सव नक्की कोणत्या गटाकडून साजरा होतो. हे पाहावे लागेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र शिंदे गटाच्या भोईर यांना परवानगी दिल्यामुळे तूर्तास तरी भोईर यांच्याहस्ते नवरात्र उत्सव साजरा होणार असल्याचे दिसते आहे. दसरा मेळावा आता दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्र उत्सव यावरून दोन्ही गटात वाद पेटला आहे.
दोन्ही गटात सुरु असलेला राजकीय आखाडा आता सांस्कृतिक सणांमध्ये सुद्धा रंगतो आहे. असेच काहीसे चित्र सध्या महाराष्ट्रातील जनतेसमोर दिसते. शेवटी दुर्गाडी गडावर कोण उत्सव साजरा करणार? शिवसेना न्यायालयात जाणार का? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. तरी या प्रकरणाचे पुढे काय होते? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
dussehra melava : अखेर ठरलं! दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला? पालिकेने एका वाक्यात केला विषय ‘क्लोज’
Shinde Group : …तर आम्ही उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू पण ‘या’ अटीवर; शिंदे गटाची ठाकरेंना जाहीर ऑफर
Uddhav thackeray : ‘ तुम्हाला राखी बांधायला हीच बाई मिळाली का?’ उद्धव shivsena : ठाकरेंनी भर सभेत ‘या’ महिलेवर ओढले ताशेरे