Bilquis Bano case: गोध्रा ट्रेन आगीच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये बिल्कीस बानो बलात्कार प्रकरण घडले होते. त्या प्रकरणात आजन्म कारावास भोगत असलेल्या आरोपींची नुकतीच तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर समाजातील काही लोकांकडून आरोपींचे स्वागत, सत्कार झाला. ही गोष्ट समाजात अस्वस्थता निर्माण करणारी आहे.
या गोष्टीवर त्यावेळी बिल्कीस बानो प्रकरणाचा पहिला निकाल देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष न्यायाधीश यु. डी. साळवी यांनी आपली प्रतिक्रिया एका मुलाखती दरम्यान व्यक्त केली आहे. एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत न्या. साळवी म्हणाले, ‘फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कलम ४३२ नुसार आरोपीला शिक्षेतून सवलत उपलब्ध आहे. कोणत्याही आरोपीला ती सवलत उपलब्ध असते. त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.’
‘मात्र बिल्कीस बानोच्या बाबतीत शिक्षेतून सवलत मिळालेल्या आरोपींनी गोध्रा उप-गृह न्यायालयातून बाहेर येताना ज्या पद्धतीचे सत्कार स्वीकारले. आणि विजयी झाल्याच्या अविर्भावात हात उंचावून हातवारे (विक्ट्रि साईन) केलं. हा प्रकार अतिशय घाणेरडा, किळसवाणा आणि लज्जास्पद होता, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘खरंतर कैद्यांनी निमुटपणे कारागृहाच्या बाहेर जायला हवं होतं. आणि त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या मंडळींना सत्कार करणे, हारतुरे देणे आणि मिठाई वाटणे या गोष्टी करू नका, असं सांगायला पाहिजे होतं. मात्र तसं न करता उलट आरोपींनी जे वर्तन केले ते लज्जास्पद आणि संताप आणणारे आहे.’
‘त्या आरोपींना ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली. त्या गुन्ह्याबद्दल त्यांना कोणताही खेद नाही, खंत नाही, हेच त्यांच्या वर्तनातून दिसून येते. एवढेच नाही तर त्यांनी केलेल्या मूळ गुन्ह्याबद्दल (बलात्कार) आरोपींना पश्चाताप आहे, असे दिसत नाही,’ असे मत यावेळी न्यायमूर्ती साळवी यांनी व्यक्त केले.
‘या आरोपींच्या शिक्षेच्या सवलतीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. आता यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालय या आरोपींना कारागृहाबाहेर येतानाच्या त्यांच्या वर्तनाबद्दल प्रश्न विचारेल. तेव्हा मात्र त्यांना आता जे त्यांनी वर्तन केले. त्याचे समर्थन करणे कठीण जाणार आहे,’ असेही न्यायाधीश साळवी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेना भवन दादरला नव्हे तर ठाण्याच्या टेंभी नाक्यावर? वाचा नेमकं काय घडलं…
ठाकरे गटाला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने केली ‘ही’ मागणी मान्य
मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आरोपांना संभाजीराजेंचं उत्तर; म्हणाले, ‘नाचक्की करणार असाल तर सहन करणार नाही..’