Share

जन्मताच बाळाला होती दोन डोकी आणि तीन हात, डॉक्टरांनी सांगितलेले कारण ऐकून आईला बसला धक्का

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रूग्णालयात एका महिलेला अनोखे बाळ झाल्याची चर्चा रंगली आहे. या बाळाला चक्क दोन डोके, तीन हात आहेत. महिलेच्या या बाळाला बघण्यासाठी बाहेरील गावातूनही लोक येत आहेत. सध्या या बाळाची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे.

सांगण्यात येत आहे की, हे बाळ करोडो नवजात बाळांपैकी एक आहे. या बाळाच्या आईचे नाव शाहीन असे आहे. आपल्या बाळाला पाहून शाहीन देखील थक्क झाली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, या बाळाला दोन डोकं, तीन हात आहेत.

या बाळाचा तिसरा हात दोन चेहऱ्याच्या पाठीमागे आहे. बाळाच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. रुग्णालायातील डॉक्टरांच्या म्हणले आहे की, असे खूप कमी गर्भ जगतात.

अनेकदा गर्भातच त्यांचा प्रवास संपतो. तसेच जर असं बाळ जन्माला आलं तरी त्यांचा जीवनकाळ हा अवघा ४८ तासांचा असतो. आता हे बाळ किती काळ जगेल याबाबत डॉक्टरांनी सांगितले नाही. अशी बाळे मोठी झाली तरी त्यांना अनेक अडचणींची सामना करावा लागतो.

भारतात यापूर्वीही अशा बाळांचा जन्म झाला आहे. परदेशात अशा अनेक केसेस पाहिला मिळाल्या आहेत. परंतु या केसेसमधील बाळही जास्त दिवस जगू शकलेले नाही. काही केसेसमध्ये अशा बाळांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

परंतु हे खूप जोखमीचे काम असल्यामुळे तुरळकच डॉक्टरांशी अशा केसेस हाताळण्याची जबाबदारी घेतली आहे. आता मध्य प्रदेशात असेच बाळ जन्माला आल्यामुळे त्या बाळावर उपचार प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. परंतु या बाळाच्या जगण्याची गॅरंटी कोणत्याही डॉक्टरांनी दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र झाला मास्कमुक्त, जाणून घ्या कोणकोणते निर्बंध हटवले
जॉन अब्राहम साऊथ इंडस्ट्रीवर भडकला, म्हणाला, मी हिंदी चित्रपटाचा हिरो आहे आणि..
रवी शास्त्रींनी भारतासाठी शोधला नवीन वेगवान गोलंदाज, म्हणाले, ‘हा फलंदाजांसाठी ठरेल डोकेदुखी’
मिलिंद गवळी यांना अभिनयात यश मिळावं, यासाठी त्यांच्या सासूबाई करायच्या ‘हे’ काम; अभिनेत्याने सांगितला किस्सा

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now