मावशी म्हणजे दुसरी आईच असते. मात्र, याच एका आईसमान मावशीने आपल्या बहिणीच्या मुलीसोबत असे काही कृत्य केलं, जे वाचून तुम्हांला देखील धक्का बसेल. मावशीला पोलिसांनी अटक केलं आहे. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
ही घटना भंडारा जिल्ह्यात साकोली येथे घडली आहे. या प्रकरणात मावशीने नात्यातील सर्व सीमा पार केल्या आहेत. आपल्या बहिणीच्या मुलीच्या चहात गुंगीचे औषध टाकून तिला बेशुद्ध केलं आहे. एवढेच नाही तर बेशुद्ध अवस्थेत असताना तिला उघडं करून, एका मुलासोबत झोपलेला व्हिडीओ देखील काढला आहे.
पीडित मुलगी गोंदिया जिल्ह्यातील आहे. एक वर्षांपूर्वी या प्रकरणाला सुरुवात झाली आहे. मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी व तिची आई साकोली तालुक्यातील एका गावात चुलत मावस बहिणीकडे विवाह समारंभाकरिता आली होती. समारंभ आटोपल्यानंतर दोघी मायलेकी मुक्कामाला थांबल्या होत्या.
यावेळी, पीडित मुलीच्या चुलत मावशीने तिला चहा दिला आणि तिला साड्या पाहाण्याकरिता बोलाविले. चहा पिऊन मुलगी मावशीच्या रूममध्ये साड्या पाहायला गेली. त्यावेळी, तिला अचानक चक्कर आली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा न पाहून तिला धक्का बसला.
त्यानंतर, तिनं मावशीला याबद्दल विचारणा केली असता, मावशीने तिला तिचे नग्न अवस्थेत मुलासोबत झोपलेले व्हिडीओ आणि फोटो दाखवले. तसेच जर कोणाला याबद्दल सांगितले तर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली. मावशीने आपल्याला चहा मधून गुंगीचं औषध दिलं होतं, हे तिला माहिती झालं.
मात्र, मावशीने तिला फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्यामुळे तिने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. तेव्हापासून त्या मुलीसोबत हा प्रकार वारंवार होऊ लागला. ज्या मुलासोबत मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ तयार केले, त्याने देखील हे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीला वारंवार फोन करून तिच्या गावी जाऊन तिचे शोषण केले.
मात्र, मागील महिन्यात पीडित मुलीच्या गावी पुन्हा एक लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक तेथे आले. मावशीने मुलीला चौकात बोलावले होते. मात्र यावेळी धाडस करून मुलीने तिच्या घरच्यांना मावशी देत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. त्यावर आई वडिलांनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मावशीला आणि संबंधित मुलाला अटक केली.