८ जुलैच्या सकाळी संपूर्ण जगाला मोठा धक्का देणारी भयानक घटना घडली. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या, त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने जपानमध्ये एकच खळबळ उडाली आणि त्या घटनेचे पडसाद जगभरात उमटले. (The assassination of Shinzo Abe of Japan and the Agneepath scheme, what is the connection)
जपानमधील नारो शहराच्या मध्यवर्ती भागात निवडणूकपूर्व प्रचार सभेत भाषण करत होते, त्यादरम्यान जमलेल्या लोकांच्या गर्दीत दडून बसलेल्या 41 वर्षीय व्यक्तीने कॅमेरा सदृश्य वस्तूत लपवलेल्या बंदुकीने आबेंवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तातडीने हत्या करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले.
अधिक माहितीनुसार, तेट्सूया यामागामी असे हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो जपानच्या ‘मरीटाइम सेल डिफेन्स फोर्स’ मध्ये 2005 पर्यंत काम करत होता. त्यानंतर सध्या कोणतेही काम हाती नसल्याने तो बेरोजगार होता.
भारतामध्ये राजकीय पक्ष समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी शिंजो आबेंच्या हत्येचा संबंध भारतात सध्या चर्चेत असणाऱ्या अग्निपथ योजनेशी जोडला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, हत्या करणारा व्यक्ती जपानच्या JMSDF या फोर्सचा माजी सैनिक होता.
JMSDF म्हणजेच जेथे सैनिकांना पेन्शन दिली जात नाही, निवृत्तीनंतर कोणते लाभ देखील दिले जात नाही. हत्या करणाऱ्या माथेफिरूला कोणतीही पेन्शन अथवा निवृत्तीचा लाभ मिळत नव्हता. म्हणूनच त्याला प्रचंड नैराश्य आले. तो बेरोजगार होता, या रागातूनच त्या सैनिकाने शिंजो आबेंची हत्या केली.
पोलीसांनी अटक केल्यानंतर यामागामीने सांगितले की, शिंजो आबेंवर तो तीव्र नाराज होता. त्यांचे कामकाज आणि विविध निर्णयांबाबत असंतुष्ट होता त्यामुळे आबेंना मारले, असे त्याने सांगितले. परंतु भारतात आबे यांच्या हत्येमागे विविध कारणे असल्याची चर्चा रंगते आहे.
महत्वाच्या बातम्या-
रणबीर कपूरला दहावीत मिळाले होते फक्त एवढे गुण, म्हणाला, पास झालेलो मी कुटुंबातील पहिला व्यक्ती
भाजप आमदाराच्या घरासमोर सापडलं मोठं घबाड; वाचा नेमकं प्रकरण काय?
मला आपल्याशी बोलायचंय.., उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या एकमेव अपक्ष माजी मंत्र्याने दिले आमंत्रण