Share

मुंबईच्या ‘या’ साध्या रेस्टॉरंटमध्ये अंबानी कुटुंबीय घेतात जेवणाचा आस्वाद, नाव वाचून अवाक व्हाल

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी सर्वांनाच जाणून घ्यायची उत्सुकता असते. सर्वांना त्यांच्या राहणीमान आणि अनेक गोष्टीचे अप्रूप वाटत असते. त्यांचे चाहते हे सर्व जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अंबानी कुटूंबीय मुंबईत नेमक्या कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यास जातात याबद्दल माहिती देणार आहोत.

मुंबईत अंबानी कुटुंब ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवणास जाते त्याचं नाव  ‘स्वाति रेस्टॉरंट’ आहे. या रेस्टॉरंटची मालकीन आशा झवेरी या आहेत. त्यांनी त्यांच्या आईच्या म्हणजेच मिनाक्षी झवेरी यांच्या निधनानंतर 1979 मध्ये हे रेस्टॉरंट सांभाळण्यास घेतले. त्यांच्या रेस्टॉरंट मध्ये अंबानी आणि त्यांचे सर्व कुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी नेहमी येतात.

मुकेश अंबानी यांनी शेअर केल्या पोस्टमध्ये स्वाति रेस्टॉरंटचे नाव पुढे आले आहे. या पोस्टमध्ये अंबानी म्हणाले आहेत की, आठवड्यातून आम्ही एकदा तरी या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. यावरून हे रेस्टॉरंट अंबानी कुटुंबाचे आवडते रेस्टॉरंट आहे, असे सांगण्यात येत आहे.

या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात आणि हीच या रेस्टॉरंटची खासियत आहे. त्यांची स्पेशल डिश पेरू-नुशा आणि मेथीची चपती यांचं कॉम्बिनेशन हे आहे. पेरू-नुशा हा पेरूपासून बनवला जाणारा पदार्थ असून जैन समाजात लोकप्रिय आहे. त्याच वेळी, मेथीचा स्वतःचा एक विशेष कडूपणा असतो आणि ही खासियत गोड करीशी परिपूर्ण जुळते.

अंबानी आणि अनेक सेलेब्रिटी या रेस्टॉरंटमध्ये 1963 पासून येतात. त्यांना या रेस्टॉरंटमधील वेगळे आणि हटके पदार्थ आवडतात. माहितीनुसार, मुकेश अंबानी हे पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यांना भारतीय पदार्थ खूप आवडतात. मुकेश अंबानी यांना अतिशय साधे आणि हलके अन्न खायला आवडते. दुपारच्या जेवणात ते विशेषतः मसूर, भात, भाजी रोटी खातात.

नाष्ट्याला ते रोज पपईचा ज्यूस आणि काजू खातात. रविवारी मुकेश अंबानी साऊथ इंडियन पदार्थ खातात. त्यांना जेवणाची खूप आवड आहे. भारतातील सर्वात श्रीमंत माणूस असूनही त्यांना रस्त्यालगतच्या स्टॉलवर खायला आवडते. जेव्हा जेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला अन्न खायचे असते तेव्हा तिथे गाडी उभा करून खातात.

इतर

Join WhatsApp

Join Now