Share

खुपच वाईट! ‘त्या’ एका भूमिकेने उद्ध्वस्त झाले अभिनेत्रीचे करिअर, ३८ वर्षांनंतरही मिळेना काम

एकता कपूरची ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagi Kay) ही मालिका पहिल्यांदाच प्रसारित झाली, तेव्हा अनुराग आणि प्रेरणा यांच्याशिवाय सर्वाधिक चर्चेत असलेले नाव होते कोमोलिका (Komolika). ही भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी उर्वशी ढोलकियाने (Urvashi Dholakia) कठोर परिश्रम घेतले होते. या भूमिकेने उर्वशीचे नशीब असे बदलले की ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. पण नुकताच उर्वशीने असा खुलासा केला आहे की, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.(Negative Role, Kasauti Zindagi Ki, Urvashi Dholakia, Ekta Kapoor)

उर्वशी ढोलकियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काम न मिळाल्याचा उल्लेख केला होता. उर्वशी संवादात म्हणाली, टाईपकास्ट भूमिका केल्यामुळे काम मिळण्यात अनेक अडचणी येतात. अभिनेत्री म्हणाली की, तिने बहुतेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत, त्यामुळे आता तिला कोणीही सकारात्मक भूमिका देत नाही.

लोकांमध्ये माझी प्रतिमा नकारात्मक अभिनेत्री अशी झाली आहे, असेही अभिनेत्री म्हणाली. मला यात कोणतीही अडचण नाही, माझा विश्वास आहे की हा माझा यूएसपी आहे. पण आशा आहे की एखाद्या दिवशी कोणीतरी मला दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहील. उर्वशी ढोलकियाने टीव्ही इंडस्ट्रीत काम करून ३८ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र तरीही तिला काम मिळण्यात अडचणी येत आहेत.

Urvashi Dholakia Twins Wants Her To Get Married | उर्वशी के बच्चे मां की दोबारा चाहते हैं शादी

याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, मला अजूनही काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मला टाइपकास्ट करण्यात समस्या आहे. उर्वशी ढोलकियाने ‘श्रीकांत’ या टीव्ही मालिकेत राजलक्ष्मीची भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘देख भाई देख’, ‘जमाना बदल गया’, ‘वक्त की रफ्तार’ आणि ‘शक्तिमान’मध्ये दिसली. पण तिला खरी ओळख ‘कभी सौतन कभी सहेली’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमधून मिळाली. उर्वशी रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन६’ ची विजेती देखील आहे.

तिला पुढे विचारण्यात आले की, इतके दिवस इंडस्ट्रीत राहूनही ऑडिशन द्याव्या लागतात का? तेव्हा उर्वशी ढोलकिया म्हणाली, ‘टीव्हीसाठी नाही. पण मी ठरवले आहे की जर कोणी मला ऑडिशनसाठी बोलावले आणि ती भूमिका नकारात्मक असेल तर मी त्याकडे लक्ष देणार नाही. कारण ही गोष्ट माझ्या दृष्टीने पूर्णपणे तर्कविरहित आहे.

उर्वशी पुढे म्हणाली, जर कोणाच्या मनात माझ्याबद्दल अशी भूमिका असेल जी पूर्णपणे वेगळी असेल आणि त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावले असेल तर मी त्यांना दोष देणार नाही. त्या भूमिकेत जर मी चांगलं काम करू शकले तर ते माझ्यासाठी चांगलं असेल. जर ते मला वेगळ्या भूमिकेत पाहू इच्छित असेल तर ती चांगली गोष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या-
जळगावच्या पठ्ठ्याने बनवले फेसबूकला टक्कर देणारे ॲप, आले भारताचे स्वत:चे इंडीया ॲप जाणून घ्या त्याबद्दल..
देवमाणूस मालिकेतील किरण गायकवाडने घेतला प्रेक्षकांचा निरोप; चाहत्यांना धक्का 
प्रसिद्ध अभिनेत्रीला १३-१४ वर्षांच्या मुलांनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, धक्कादायक कारण आले समोर
‘या’ मुलीमुळे सुशांत सिंग राजपूत 4 रात्री झोपू शकला नाही; ‘असा’ होता त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now