Kanishka Soni, Relationship, Casting Couch/ ‘दीया और बाती हम’ आणि ‘पवित्र रिश्ता’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री कनिष्का सोनीने (Kanishka Soni) नुकतेच लग्न केले आहे. आता तिने एका संभाषणात तिचे अपमानास्पद रिलेशनशिप आणि कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार एका निर्मात्याने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. जाणून घ्या, रिलेशनशिपदरम्यान एका अभिनेत्याने कनिष्काला कसे मारहाण केली आणि रूममध्ये न गेल्याने एका निर्मात्याने तिला शोमधून कसे बाहेर काढले.
कनिष्काने एका खाजगी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, जेव्हा ती मुंबईत आली तेव्हा तिला अनेक मुलांनी प्रपोज केले आणि यादरम्यान तिने १२००-१३०० प्रपोजल नाकारले. ती म्हणाली, एका अतिशय प्रसिद्ध अभिनेत्याने मला प्रपोज केले, पण त्याचा खरा चेहरा दोन महिन्यांनी समोर आला. तो खूप हिंसक होता. मला नावावरून वाद निर्माण करायचा नाही, पण तो खूप हिंसक होता आणि दर 15 मिनिटांनी त्याला राग यायचा.
ती पुढे म्हणाली, तो वस्तू तोडायचा आणि मला मारहाण करायचा. माझी आई नेहमी म्हणायची की एकावेळी एकाच माणसासोबत असायला हवं. मी दीड वर्ष हे नातं संभाळल. या संभाषणात कनिष्काने खुलासा केला की, दिवसभर काम करूनही ती त्याच्या खोलीत न गेल्याने एका निर्मात्याने तिला टीव्ही शोमधून काढून टाकले होते.
आणखी एका घटनेची आठवण करून देताना कनिष्का म्हणाली, २००८ मध्ये एका ए-ग्रेड चित्रपटाच्या निर्मात्याने मला त्यांच्या घरी बोलावले जेणेकरून ते माझे पोट पाहू शकतील. मी त्यांना सांगितले की मी हे चित्रपटासाठी करेन. यावर तो म्हणाला की जर तू इथे करत नाहीस तर चित्रपटात कसं करणार? त्यावेळी पोट दाखवणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
कनिष्का म्हणाली, बाबूभाई दिभा यांचे आभार, ज्यांच्यामुळे मी काही छोट्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण माझे स्वप्न प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौतसारखे बनण्याचे होते. कनिष्काने दावा केला की, तिने अक्षय कुमार स्टारर ‘हाऊसफुल’मध्ये आयटम नंबर करण्यास नकार दिला होता. मात्र, तिने तमिळ संगीत दिग्दर्शक श्रीकांत देवासाठी आयटम नंबर केला आहे.
अलीकडेच कनिष्का सोनीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेली दिसत आहे. तिने त्यासोबत लिहिले की तिची स्वप्ने तिची स्वतःची आहेत आणि ती स्वतःवर प्रेम करते. आपल्याला कोणाचीही गरज नसल्याचेही तिने सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
Congress President : ‘सोनिया गांधीच सांभाळणार २०२४ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्षपद’, सर्व नेत्यांनी चर्चेमध्ये केली ‘ही’ मागणी
Cricket : आशिया चषकात रंगणार भारत – पाकीस्तान महामुकाबला; ‘असा’ पाहता येईल मोबाईलवर LIVE
Diya Aur Baati Hum: ‘दिया और बाती हम’ अभिनेत्रीने स्वतःशीच केले लग्न; म्हणाली, ‘मला पुरुषांची गरज नाही, कारण मी…’