बॉलीवूडमध्ये(Bollywood) असे अनेक स्टार्स झाले आहेत, ज्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. मात्र चित्रपटांमध्ये काम करूनही त्यांना नंतर पैशांच्या तंगीला सामोरे जावे लागले. अनेक स्टार्सकडे त्यांच्या उपचारासाठीही पैसे नव्हते. असेच एक प्रकरण साऊथ इंडस्ट्रीतून समोर आले आहे. साऊथमधील ज्येष्ठ अभिनेत्री जयाकुमारी(Jayakumari) किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत आहेत, मात्र त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत.(the-actress-who-has-acted-in-250-films-doesnt-even-have-money-for-treatment-pleads-for-help-from-the-public)
वास्तविक, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री जयाकुमारीला किडनीशी संबंधित आजारामुळे चेन्नईतील सरकारी रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आले आहे. 72 वर्षीय अभिनेत्री जयाकुमारी यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. जयाकुमारी 1960 ते 1970 च्या दशकात मल्याळम आणि तामिळ सिनेमांमध्ये खूप ॲक्टिव होत्या.
जयाकुमारीचे फोटो सोशल मीडियावर(Social media) चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे. असे सांगितले जात आहे की त्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, ज्यामुळे त्या योग्यरित्या उपचार करू शकत नाही. अशा परिस्थितीत तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यन यांनी मदतीचा हात पुढे केल्याची बातमी आहे.
वृत्तानुसार, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यन(M Subramanian) यांनी जयकुमारीच्या प्रकृतीबाबत ऐकल्यानंतर त्यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्या वैद्यकीय बिलांची काळजी सरकार घेईल आणि त्यांना घर उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले. याच रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जयकुमारीच्या तीन मुलांपैकी कोणीही रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेतले नाही.