काही काळापूर्वी बॉलीवूडमध्ये #मी टू चळवळीने मोठे थैमान घातले होते. या चळवळीत नाना पाटेकरांवर आरोप केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता टाकलेली एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. तिचा छळ होत असल्याचा गंभीर आरोप तिने या पोस्टमध्ये केला आहे. (The actress who came into the limelight due to the Me Too Movement, again made serious allegations)
इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ‘माझा छळ केला जात आहे. मला अतिशय वाईट पद्धतीने टार्गेट केलं जात आहे. प्लीज कोणीतरी यातून मला वाचवा! आधी एका वर्षात बॉलीवूडमधील माझं काम संपवण्यात आले. त्यानंतर पिण्याच्या पाण्यात वेगवेगळी औषधे , स्टेरॉईड टाकण्याकरिता एका मोलकरणीला माझ्याकडे पाठवण्यात आलं. त्यामुळे माझ्या आरोग्याला गंभीर इजा पोहोचली आहे.
पुढे ती म्हणाली की, या सगळ्यापासून दूर उज्जैनला मी जात असताना दोनदा माझ्या गाडीचा ब्रेक फेल करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून माझ्या गाडीचा अपघात झाला. या जीवघेण्या हल्ल्यातून ती बचावल्याचा दावा तिने केला आहे. ४५ दिवसांनी पुन्हा घरी परतल्यानंतर फ्लॅटबाहेर काही घृणास्पद वस्तू आढळल्याचे ती सांगते.
यावर तिने म्हंटले आहे की, ‘मी आत्महत्या करणार नाही, लक्षात ठेवा. मी सगळं सोडून कुठेही जाणार नाही. मी इथे राहण्यासाठी, स्वतःच करिअर आधीपेक्षा वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आली आहे. बॉलीवूडमधील माफिया, महाराष्ट्रातील जुने राजकीय वर्तुळ, तसेच राष्ट्रद्रोही गुन्हेगार अशा लोकांची ही कामे आहेत.’ असे गंभीर आरोप तिने केले.
ती असंही म्हणाली की, ‘मी उघडकीस आणलेले #मी टू चे गुन्हेगार, काही एनजीओ यांचा या सगळ्यामागे हात आहे. अन्यथा इतर कोण माझा का छळ करेल? का मला त्रास देईल, असे म्हणत पुढे तिने राज्यात राष्ट्रपती राजवट, लष्करी राजवट लागू करावी. केंद्राने राज्यातील छोट्या मोठ्या गोष्टींवर नजर ठेवावी.
मला खूप त्रास होतोय. इथे परिस्थिती खूप हाताबाहेर चालली आहे,’ असे तिने म्हंटले आहे. एवढी मोठी लांब लचक पोस्ट करत तनुश्री दत्ताने गंभीर आरोप केले आहेत. तिच्या या पोस्टची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. तसेच अनेक चाहते या पोस्टवर आपली प्रतिक्रिया देताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या-
Aishwarya Rai: अनेक वर्षांनंतर ऐश्वर्याला आठवला सलमान, म्हणाली, सुरूवातीला आमिर आणि सलमान…
VIDEO: Urfi Javedला पारदर्शक ड्रेसमध्ये पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी, लुक पाहून सगळेच झाले बेभान
‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १ लाखाचे झाले २८ कोटी