Share

‘एम एस धोनी माझ्या आयुष्यासाठी काळा डाग’, अभिनेत्रीने पहिल्यांदाच अफेअरबाबत केला खुलासा

महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी धोनी त्याच्या अनोख्या फलंदाजीच्या शैलीसोबतच त्याच्या स्टायलिश लूकमुळेही आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा. यादरम्यान त्याच्या अफेअरच्या अनेक बातम्या आल्या, त्यापैकी राय लक्ष्मी(Rai Lakshmi) आणि त्याच्या नात्याच्या अफवांच्या चर्चांना उधाण येत होत.(the actress revealed about the affair for the first time)

एकेकाळी महेंद्र सिंह धोनी अभिनेत्री राय लक्ष्मीला डेट करत होता. २००८-२००९ मध्ये त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. धोनीला डेट करणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. राय लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, तिची आणि धोनीची भेट २००८ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. यादरम्यान दोघे जवळ आले. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

या नात्याबद्दल महेंद्र सिंह धोनी कधीच काही बोलला नाही, पण धोनीशी संबंधित प्रश्नांना राय लक्ष्मी मनमोकळेपणाने उत्तरे देते. एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, धोनी आणि इतर गोष्टी, हे कास्टिंग काउच नव्हते. तुम्हाला कोणीतरी आवडते, नंतर तुम्हाला ती व्यक्ती आवडत नाहीत, काही गोष्टींमध्ये तुमचं नीट पटत नाही आणि तुम्ही लगेच वेगळे होता. मी रिलेशनशिपमध्ये नाही असे म्हटले नाही, मी अनेक रिलेशनशिपमधून गेले आहे.

एक्ट्रेस Raai Laxmi का बड़ा खुलासा, MS Dhoni मेरे जिंदगी के लिए काला धब्बा

अभिनेत्री राय लक्ष्मीने सांगितले की, आमचे नाते चांगले चालले होते पण काही गोष्टींवरून आमच्यात वाद सुरू झाला. अभिनेत्रीने सांगितले की, त्यानंतर आमचे ब्रेकअप झाले. धोनीसोबत संबंध असणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा काळा डाग असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की महेंद्र सिंह धोनी यांनी साक्षी रावतसोबत ४ जुलै २०१० रोजी लग्न केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी साक्षी आणि धोनी २ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. सध्या, धोनी त्याच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे, अनेकदा साक्षी सामन्यादरम्यान स्टँडवर धोनीला सपोर्ट करताना दिसते. या दोघांची मुलगीही त्यांच्यासोबत दिसत आहे, जिचे नाव या जोडप्याने जीवा ठेवले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या या खेळाडूच्या हुशारीसमोर धोनीही झाला फेल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
IPL 2022: धोनी बाद झाल्यानंतर विराट कोहलीने केली शिवीगाळ? व्हायरल होतोय व्हिडीओ
धडाकेबाज खेळीनंतर ऋतुराज गायकवाडने धोनीबद्दल केले मोठे वक्तव्य; म्हणाला, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना
ब्रेकिंग! ६ पराभवांनंतर जडेजाने पुन्हा धोनीकडे सोपवले चेन्नईचे कर्णधारपद, कारण वाचून व्हाल हैराण

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now