Shakti Kapoor : बॉलीवूडचा खलनायक म्हणून ज्याची कारकीर्द चांगलीच गाजली असा अभिनेता शक्ती कपूर अनेकदा वादात सापडला आहे. शक्ती कपूरने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका उत्तम प्रकारे साकारली. त्यामध्ये त्याने अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन सुद्धा दिले. ते रेप सीन त्या काळात चर्चेचा विषय ठरले. मात्र त्यानंतर सिनेमांमध्ये रेप सीन देण्यासाठी शक्ती कपूर फेमस झाल्याचे दिसले.
त्या काळात शक्ती कपूरच्या वाट्याला येणाऱ्या खलनायकी भूमिकांमध्ये हमखास रेप सीन पाहायला मिळायचे. तब्बल ८० चित्रपटांमध्ये शक्ती कपूरने रेप सीन दिले आहेत. १९८२ साली आलेल्या ‘गुमसुम’ चित्रपटातील त्याचा रेप सीन चांगलाच चर्चेत आला होता. ‘मेरे आघोष’ या चित्रपटातील त्याचे बोल्ड सीन चर्चेचा विषय ठरले होते. त्यावर पुढे अनेक वाद सुद्धा झाले.
शक्ती कपूरने या चित्रपटात दिलेले बोल्ड सीन पाहून तर सेन्सॉर बोर्डला पण धक्काच बसला. एक वेळ अशी आली होती की, शक्ती कपूरच्या चित्रपटांना सेन्सर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर मधल्या काळात शक्ती कपूरने गोविंदासोबत अनेक विनोदी सिनेमांमध्ये हलक्या फुलक्या भूमिका केल्या. त्या ठिकाणी विनोदाचे उत्तम टाइमिंग शक्ती कपूरने साधल्यामुळे त्याला चाहत्यांची लोकप्रियता मिळाली.
२००५ ला शक्ती कपूरने एका अभिनेत्रीकडे छोट्या पडद्यावरील सिरीयलमध्ये काम देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसले. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.अशा एक ना अनेक वादांमध्ये तो कायमच सापडताना दिसला आहे.
त्याने पूनम पांडे या नवोदित अभिनेत्रीसोबत ‘द जर्नी ऑफ कर्मा’ नावाच्या बोल्ड चित्रपटात काम केले. त्यावेळी त्याची सहकलाकार असणाऱ्या पूनम पांडेने त्याच्यावर असा आरोप केला की, ‘शक्ती कपूर सीन करत असताना उत्तेजित होतो. रील लाईफमध्ये नव्हे तर रिअल बेडरूममध्ये सीन सुरू आहे, असेच वाटते.’
शक्ती कपूरने खलनायक म्हणून आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. शक्ती कपूरवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे बॉलीवूडमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली. आपल्या बिनधास्त आणि बोल्ड भूमिकांमुळे शक्ती कपूर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. मात्र शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूरने बॉलीवूडमध्ये येत वेगळ्याच प्रकारची आपली इमेज बनवत मोठे यश मिळवल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
murji patel : अंधेरी पोटनिवडणूक: अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने दबाव टाकला? मुरजी पटेल म्हणाले, मी पक्षाला..
Suryakumar yadav : ‘तो जगातील नंबर १ फलंदाज’, ऑस्ट्रेलियन खेळाडूने ‘या’ भारतीय फलंदाजाचे केले तोंडभरून कौतुक
Pune: पुणेकरांनी वाहतूकीचे नियम मोडले तरी दंड होणार नाही; चंद्रकांत पाटलांचे पोलिसांना स्पष्ट आदेश