बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंमुळे ती प्रचंड चर्चेत असते. मात्र, आता ती चर्चेत येण्याचे कारण वेगळच आहे. अदानं असं काही केलं आहे की लोकांचा विश्वास बसत नाही.
तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अदा ने नेमकं असं काय केलं, ज्यामुळे सध्या तिची सर्वत्र चर्चा होत आहे. तर ती सध्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे अदाला भाऊ नाही म्हणून ती रस्त्यावर रक्षाबंधन साजरा करत असल्याचे दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अदानं रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये अदा मुंबईच्या रस्त्यावर ऑटोरिक्षा चालकाला राखी बांधताना दिसत आहे. अदानं ऑटोरिक्षा चालकाला राखी बांधली यामुळे तिची ही स्टाईल नेटकऱ्यांना आवडली.
एकीकडे तिच्या या साधेपणामुळे नेटकरी तिच्या या व्हिडिओला प्रचंड लाईक करत आहेत तर, दुसरीकडे तिला काहींनी ट्रोल देखील केलं आहे. या व्हिडिओमध्ये अदा तिला भाऊ नसल्याचं सांगताना दिसत आहे, त्यामुळे ती मुंबईच्या रस्त्यावर अनेक रिक्षाचालकांना राखी बांधताना दिसत आहे.
एवढंच नाही तर अदा या ऑटोवाल्यांकडून सुरक्षेचे आश्वासनही घेताना दिसत आहे. अदा म्हणते, ‘आम्ही मुली मुंबईच्या रस्त्यावर सुरक्षितपणे प्रवास करू शकलो ते केवळ या लोकांमुळे. याबद्दल धन्यवाद. आम्ही मुली खूप भाग्यवान आहोत, असे ती म्हणते.
अदा बद्दल अधिक माहिती म्हणजे, बॉलिवूड आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी अदा एक आहे. २००८ मध्ये अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘१९२०’ या चित्रपटातून अदानं तिच्या करिअरची सुरुवात केली. अदानं ‘कमांडो २’, ‘हसी तो फसी’ आणि ‘हम हैं राही कार के’ सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.