Share

एकेकाळी अनिल अंबानींच्या लग्नात वेटरचं काम केलं, आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

राखी सावंत(Rakhi Sawant) हे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. लोकांचे मनोरंजन करण्यात ती इतका पटाईत आहे की तिची दरवर्षी बिग बॉसमध्ये एन्ट्री जवळपास निश्चित मानली जाते. पण आजची प्रसिद्ध राखी सावंतने याआधीही अनेक संकटांचा सामना केला आहे.(The actress had worked as a waiter in Anil Ambani’s wedding)

बॉलिवूड इंडस्ट्रीत अशी एक अभिनेत्री आहे, जिला लोक ड्रामा क्वीन या नावाने ओळखतात. आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंदाज तुम्हाला आला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही बोलत आहोत अभिनेत्री राखी सावंत बद्दल. अभिनेत्री तिच्या भडक विधानांमुळे अनेकदा चर्चेत असते. त्यामुळे चाहत्यांनी तिला ड्रामा क्वीन असे नाव दिले.

अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच हेडलाइन्समध्ये येण्यामागे एक खास कारण आहे, जे जाणून तुम्ही थक्क व्हाल. आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्री होण्याआधी राखीने एक असे काम केले आहे, ज्याबद्दल ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज काही ना काही उत्तम पोस्ट शेअर करत असते. जे चाहत्यांनाही खूप आवडते. तिच्या पोस्टवर चाहते लाइक आणि कमेंट करत आहेत. अभिनेत्रीने काही काळापूर्वी तिच्या आयुष्याबद्दल खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, तिने फार पूर्वी फक्त 50 रुपयांत एक काम केले होते.

मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्या लग्नात 50 रुपयांत जेवण देण्याचे काम तिने केले. पैशाच्या कमतरतेमुळे तिने हे काम केले. त्यावेळी अभिनेत्रीकडे ना काम होते ना पैसा. त्यामुळेच तिला हे काम करावे लागले. अनिल अंबानींच्या लग्नात अनेक बड्या अभिनेत्री पोहोचल्या होत्या, तर राखी जेवण सर्व्ह करण्यासाठी गेली होती. पण आता राखी सावंत एक ब्रँड बनली आहे. अभिनेत्री राखी सावंतने बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडतो. अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे.

दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी, आता तिने स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले आहे. राखी अखेरचा पती रितेशसोबत ‘बिग बॉस 15’ मध्ये स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर काही वादामुळे त्याला ‘बिग बॉस’चे घर सोडावे लागले होते. ‘बिग बॉस’च्या घरात राहणे चाहत्यांना खूप आवडले. तिने नेहमीच सर्वांचे मनोरंजन केले.

महत्वाच्या बातम्या-
मध्यरात्री विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात बसवला; वाईमध्ये तणावाचे वातावरण
अरुण गवळीच्या दारूच्या अड्ड्यावर माझ्या वडिलांनी पैसे मोजण्याचे काम केले, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
प्रियांका चोप्राने सासरच्या पार्टीला पार केल्या बोल्डनेसच्या सगळ्या सीमा, पहा फोटो

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now