Share

ताजमहालच्या कोर्टाच्या टिप्पणीची अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला, सत्य बाहेर येईल या भीतीने..

ताजमहालच्या २२ बंद खोल्या उघडण्याची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ताजमहाल कोणी बांधला हे ठरवणे आमचे काम नाही. असे असेल तर उद्या न्यायाधीशांकडे चेंबरमध्ये जाण्याची मागणी केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकेद्वारे करण्यात आलेली मागणी न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता यावरून बॉलिवूड अभिनेता कमाल आर. खान(KRK) यांनी खिल्ली उडवली.(The actor scoffed at the Taj Mahal court’s remarks)

कमाल आर खान यांनी ट्विटरवर लिहिले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ताजमहालमध्ये खोल्या उघडण्याची मागणी करणाऱ्या लोकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. अशी जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी न्यायमूर्तींनी त्यांना शिक्षित होण्यास सांगितले. कोर्ट म्हणाले कोणत्याही अडाणी, लुक्खाला कोर्टाला प्रश्न विचारण्याची परवानगी नाही, यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

तुषार आनंद नावाच्या युजरने लिहिले की, ‘तुम्हाला काळजी वाटते की काही उघड झालं तर सत्य बाहेर येईल.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘त्या खोल्यांच्या आत काय आहे, जे नेहमी गुप्त ठेवले पाहिजे आणि जनसामान्यांपासून लपवले पाहिजे’.  Theoldman नावाच्या युजर आयडीवरून KRK ला उत्तर देताना असे लिहिले होते की, ‘अशिक्षित किंवा कमी शिक्षित माणसाने न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करू नये. न्यायालय फक्त सुशिक्षित लोकांसाठी आहे’.

केआरकेला उत्तर देताना कुंदन सिंह नावाच्या युजरने लिहिले की, ‘काही मूर्ख लोक न्यायालयाच्या निर्णयावर असेही म्हणतात की ‘मान कापून टाकू, पण व्हिडिओग्राफी करू देणार नाही’, मग यावर ते काय म्हणतील?’ ललित नावाच्या युजरने लिहिले की, ‘द ज्ञानवापी आणि ताजमहालच्या बंद २२ खोल्यांचे सत्य बाहेर यायला हवे’.

भाजप, अयोध्येचे मीडिया प्रभारी रजनीश सिंह यांनी ताजमहालबद्दल खोटा इतिहास शिकवला जात असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. म्हणूनच सत्य शोधण्यासाठी त्याला ताजमहालच्या २२ बंद खोल्यांवर संशोधन करायचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोर्टाने याचिकाकर्त्याला यासंदर्भात प्रथम एखाद्या संस्थेतून एमए पीएचडी करण्यास सांगितले. मग आमच्याकडे या असेही सांगितले. यासाठी एखाद्या संस्थेने तुम्हाला प्रवेश दिला नाही तर आमच्याकडे या.

महत्वाच्या बातम्या-
ताजमहालातील २२ खोल्या उघडण्यासाठी याचिका करणारांना न्यायालयाने झाप झाप झापले; म्हणाले…
ताजमहाल आमच्या मालकीचा, आदेश दिल्यास कागदपत्रेही दाखवू, भाजप खासदाराचा मोठा दावा
ताजमहाल मुघलांचा नाही तर आमच्या पूर्वजांचा; जयपूरच्या राजकन्येचा पुराव्यानिशी दावा
ताजमहाल नाही तर श्रीरामाने बांधलेला सेतू प्रेमाचे प्रतीक आहे; त्याचा अभिमान बाळगा- बड्या गायकाने मांडलं मत

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now