Share

“सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिकेतील अभिनेता विवाहबंधनात; ‘या’ कलाकारांची हजेरी

स्टार प्रवाहावरील “सुख म्हणजे नक्की काय असत” मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयामुळे तर मालिकेचा टीआरपीही उंचावला आहे. सध्या मालिकेत खोट्या जयदीपचे सत्य सर्वांसमोर येण्यासाठी गौरी धडपड करताना दिसत आहे. अशातच मालिकेच्या एका कलाकारासंबंधीत एक बातमी समोर आली आहे.

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील उदय म्हणजेच अभिनेता संजय पाटील याचा नुकताच विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे. संजयने अबोली गोखलेसोबत पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे. या लग्नाला मालिकेतील अम्मा म्हणजेच आशा ज्ञाते, माधवी निमकर, अपर्णा शार्दूल, कपिल होणराव यांनी हजेरी लावली होती.

यावेळी संजयने पुष्पाचा एक डायलॉग उखाण्यामध्ये घेत ‘ही माझ्या आयुष्यात आली आणि मी झालो तिचा दिलवाला, मै झुकेगा नहीं साला…’ असे म्हटले. त्याच्या या उखाण्यावर सर्वांनीच टाळ्या वाजविल्या. संजय आणि अबोलीच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी संजय आणि अबोलीला शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी त्याचे हळदी समारंभाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आले होते. या फोटोंमधून लग्नाची धमाल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच संजय आणि अमोलीचा साखरपूडा झाला होता. त्यानंतर हे दोघे कधी लग्न करतील याकडे चाहते डोळे लावून होते.

दरम्यान संजय पाटील म्हणजेच उदय सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीपच्या भावाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या या अभिनयाला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. संजयची बायको म्हणजेच अबोली एक वेलनेस ब्लॉगर आहे. या ब्लॉगमध्ये ति योगाविषयी माहिती देत असते.

संजयने यापूर्वी कमिंग सून, मुख्यमंत्री, लेडीज बार, रानजाई अशा नाटकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तो सुकन्या, जय मल्हार, महाराष्ट्र जागते रहो अशा मालिकांमध्ये दिसला आहे. शरीराने उंच आणि देखणा असल्यामुळे संजयला नेहमी नवनवीन मालिकांच्या ऑफर येत असतात. या मालिकांचे काम पाहत असताना संजय सोशल मिडीयावरही सक्रिय असलेला दिसून येतो.

महत्वाच्या बातम्या
ऍपल वॉचच्या मदतीने करत होता गर्लफ्रेंडचा पाठलाग, बॉयफ्रेंडची युक्ती पाहून पोलिसही चक्रावले
प्रसूतीनंतरही महिलेच्या पोटात होत होत्या प्रचंड वेदना, शस्त्रक्रियेनंतर सगळ्यांना बसला जबर धक्का
‘मविआ’मधील नाराजीनाट्य थांबेणा! २५ काँग्रेस आमदार नाराज, अडीच वर्षे वाया गेल्याची भावना
मोहम्मद शमीच्या प्रेमात पडली ‘ही’ अमेरिकन पॉर्नस्टार, म्हणाली, ‘खुप छान कामगिरी केली’

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now