स्वत:ला सिनेक्रिटिक (Critic) म्हणवणारा कमाल रशीद खान म्हणजेच केआरके (KRK) त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी अधिक ओळखला जातो. प्रत्येक चित्रपटावर तो आपला रिव्यू (Review) देत असतो, जो की चित्रपटासाठी बेकारच असतो. याशिवाय देशाच्या नेत्यापासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वांनाच टार्गेट करायला तो विसरत नाही. बॉलिवूड कलाकारांबद्दलही (Bollywood Actors) तो अनेकदा विचित्र कमेंट करतो.(The actor had ridiculed Akshay)
अलीकडेच त्याने पुन्हा एकदा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारवर (Akshay Kumar) निशाणा साधला आहे. याआधीही त्याने अनेक कलाकारांना त्यांच्या नागरिकत्वाबद्दल टोमणा मारलेला आहे. यावेळीही केआरकेने अक्षयच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तेलाच्या वाढलेल्या किमतींबाबत टोमणा मारला आहे. KRK ने नुकतेच एक ट्विट करत अक्षय कुमारची खिल्ली उडवली आहे.
Sir @akshaykumar ab aap Bicycle 🚲🚲 use karoge, ya #Canada Ke Liye paidal 🚶🚶hi nikal padoge? Kyunki patrol ₹125 per litre Toh aap afford nahi kar sakte. Yaad hai na Sir Ji ₹62 per Litre Bhi Aapke Liye affordable Nahi Tha.🙏🏼
— KRK (@kamaalrkhan) April 9, 2022
KRK ने ट्विट केले आहे ज्यामध्ये त्याने अक्षय कुमारच्या 2012 च्या महागाई विरोधात केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि सोबतच तेलाच्या किमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभिनेत्याच्या नागरिकत्वाची खिल्लीही उडवली आहे. केआरकेने ट्विटरवर लिहिले की, ‘प्रिय, कॅनडाई भारतीय देशभक्त अक्षय कुमार जी, पेट्रोलची किंमत 62 रुपये असताना तुम्हाला खूप त्रास होत होता. आज पेट्रोलचा दर 124 रुपये म्हणजेच दुप्पट आहे. आता तुम्हाला काही समस्या आहेत का? अजिबात नाही ना भाऊ. उत्तम! हे या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही तुमचा देश कॅनडाचे खरे देशभक्त आहात.
याशिवाय त्याने त्याच्या पुढील ट्विटमध्ये लिहिले की, ‘अक्षय कुमारजीच्या कमाईनुसार 124 रुपयांच्या पेट्रोलची किंमत वाजवी आहे कारण 2011 मध्ये ते एका चित्रपटासाठी 20 कोटी रुपये घेत होते आणि आता ते प्रति चित्रपट 150 कोटी रुपये घेत आहेत’. इतकेच नाही तर इतर यूजर्सही या ट्विटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. जिथे लोक त्याला ट्रोल करत आहेत, ज्यामध्ये एका यूजरने लिहिले की, तो कधीच पेट्रोल, डिझेल किंवा गरीब भारतीयांच्या समस्येबद्दल बोलणार नाही. काँग्रेस सरकारला टार्गेट करून भगव्या पक्षाला सत्तेवर आणण्यासाठीच तो बोलतो.
त्याच वेळी, इतर वापरकर्ते लिहितात की ‘लोकं कधी आरसा पाहत नाही का’. याशिवाय तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, केरळ आदी राज्यांमध्ये पेट्रोलचे दर भाजपशासित राज्यांपेक्षा जास्त आहेत. याविषयी तू कधीच बोलला नाहीस.
सर्व राज्य सरकारांनी पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास पाठिंबा का दिला नाही? त्यांनी नेहमी विरोध का केला? पण तरीही तुमची अडचण फक्त भाजपची आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, केआरकेने इंडस्ट्रीतील दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु तो कधीही आपल्या अभिनयाने लोकांना संतुष्ट करू शकला नाही, त्यानंतर तो सिनेक्रिटक बनला.
महत्वाच्या बातम्या-
तब्बल साडेसात वर्षांनंतर KRK ने सुर्यकुमार यादवच्या त्या ट्विटला दिले उत्तर, वाचा पुर्ण प्रकरण
KRK ने उडवली गेहराइयां चित्रपटाची खिल्ली; दीपिकाला म्हणाला, सेक्सची मल्लिका, तर सिद्धांतला म्हणाला..
अभिनेत्याने RRR चित्रपटाची काढली इज्जत; म्हणाला, डोकं आणि पाय नसलेला चित्रपट, राजामौलींचीही उडवली खिल्ली
RRR बनवल्याबद्दल त्यांनी ६ महिने तुरूंगवास भोगावा; अभिनेत्याने राजामौलींची उडवली खिल्ली