कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने हिंदी भाषेबाबत केलेल्या विधानावर आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने सडेतोड प्रतिक्रिया दिले आहे. अजय देवगण म्हणाला, तुम्ही जर हिंदी राष्ट्रभाषा नाही म्हणता तर तुमचे चित्रपट हे तुम्ही हिंदी भाषेत का डब करून प्रदर्शित करता? असा सवाल केला आहे.
नुकतेचअभिनेता किच्चा सुदीपने त्याच्या एका चित्रपटाच्या लॉंचिंग इव्हेंटमध्ये बोलताना म्हटलं होतं की, ‘हिंदी ही राष्ट्रभाषा नाही,’ यावर आता या अभिनेत्याला अजय देवगण यानं चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगणने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली असून, किच्चा सुदीपने केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजय देवगणने पोस्ट मध्ये किच्चा सुदीपला सवाल केला आहे की, जर तुम्ही म्हणता की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तर मग साऊथ मधील चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करतात? अजय देवगणने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली.
.@KicchaSudeep मेरे भाई,
आपके अनुसार अगर हिंदी हमारी राष्ट्रीय भाषा नहीं है तो आप अपनी मातृभाषा की फ़िल्मों को हिंदी में डब करके क्यूँ रिलीज़ करते हैं?
हिंदी हमारी मातृभाषा और राष्ट्रीय भाषा थी, है और हमेशा रहेगी।
जन गण मन ।— Ajay Devgn (@ajaydevgn) April 27, 2022
त्यातच अजय देवगणच्या पोस्टला अभिनेता किच्चा सुदीपने देखील प्रतिक्रिया दिली. दोघेही या मुद्यावरून एकमेकांना प्रतिक्रिया देऊ लागले. सोशल मीडियावर सध्या या दोन अभिनेत्यांमधील वाद- प्रतिवाद पाहून चाहत्यांमध्ये देखील चर्चेला उधाण आलं आहे.
अजय देवगणने केलेल्या पोस्टवर किच्चा सुदीपने प्रतिक्रिया देताना लिहिले की, मी ज्या संदर्भात असे विधान केले आहे, ते वेगळ्या पद्धतीने मांडले जात आहे. मी भेटल्यावर माझा मुद्दा तुम्हाला नक्की सांगेल. माझा हेतू कोणालाही दुखावण्याचा, चिथावणी देण्याचा नाही, मी असं का करू? असं त्यानं लिहिले.
तसेच म्हणाला, मी माझ्या देशाच्या प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा विषय वाढवायचा नाही. मला तो इथेच संपवायचा आहे. तुम्ही म्हणता तसं माझं विधान नाही. माझ्या विधानाला वेगळं घेतलं जातं आहे. मला आशा आहे की आपण लवकरच भेटू. सध्या सोशल मीडियावर या दोन अभिनेत्यांची चर्चा अधिक रंगली आहे.