Ajit pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक बोलण्यामुळे ज्यांचा मंत्रालयात आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठा दरारा आहे. ते राष्ट्रवादीचे अजित पवार पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोड उत्तर देण्यामुळे चर्चेत आले आहेत. याआधी अजित पवार यांना कोणत्याही प्रश्नावर थेट आणि रोखठोक बोलताना महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र आपल्या पुत्राविषयी यावेळी ते स्पष्ट बोलताना आढळले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘जिल्ह्यामध्ये पक्ष कमकुवत होत चालला आहे. पार्थ पवार यांचे नेतृत्व उस्मानाबादला द्यावे,’ अशी मागणी केली. त्यानंतर अजित पवारांनी संबंधितांना चांगलेच झापल्याचे दिसले. ‘पार्थ पवार यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील नेतृत्व सोपवावे,’ असे बोलणाऱ्यांची अजितदादांनी आपल्या स्टाईलमध्ये कानउघाडणी केली.
शनिवारी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी ‘उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे. पार्थ पवार यांचे नेतृत्व जिल्ह्याला द्यावे,’ असे वक्तव्य केले. त्यावर अजित पवार यांनी ‘पक्षात एक कार्यकर्ता आहे. तोवर पक्ष संपत नसतो,’ असे म्हणत या मागणीवर भाष्य केले.
दरम्यान पार्थ पवार मागील काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवा दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन दर्शन घेताना दिसले. मागील काळात मावळ मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना हार मानावी लागली होती. त्या ठिकाणी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होत पार्थ पवारांनी वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी दिल्या. गणपती बाप्पांचे दर्शन मावळमध्ये जाऊन घेतले. याचमुळे पुन्हा एकदा पार्थ पवार राजकारणात ऍक्टिव्ह होत आहेत, अशी चर्चा रंगत आहे.
पार्थ पवार यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून दारून पराभव झाला होता. शिवसेनेचे स्थानिक खासदार श्रीरंग बारणे त्या ठिकाणी विजयी झाले होते. पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा त्याच मतदारसंघात पार्थ पवार ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर मतदारसंघ पार्थ पवार यांच्यासाठी सुरक्षित ठेवला जात असल्याचे वक्तव्य केले होते.
आता या पार्श्वभूमीवर उस्मानाबादमधून पदाधिकाऱ्यांनी जी मागणी केली. यावर अजित पवारांनी तर उत्तर दिले. मात्र येत्या काळात पार्थ पवार यांची पुढील भूमिका काय असेल? राजकारणात त्यांची वाटचाल कोणत्या दिशेने होईल? हे पहावे लागेल. मात्र पहिलीच निवडणूक, त्यात थेट लोकसभेची उमेदवारी आणि त्यातही पराभवाचा सामना करावा लागल्याने पार्थ पवारांबद्दल उलट-सुलट चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात झाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
shivsena : शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहीत दाखवली निष्ठा ; अन् नंतर उद्धव ठाकरेंनी दिला सुखद धक्का, वाचा नेमकं काय घडलं?
shivsena : ‘ही’ व्यक्ती प्रत्येक महीन्याला मातोश्रीवर १०० खोके घेऊन यायची; शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
rohit pawar : अमोल कोल्हे शहांच्या भेटीला तर पवारांचा ‘जय श्रीराम ‘चा नारा; वाचा नेमकं राष्ट्रवादीत घडतंय काय?