वाघाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण अनेकदा तुम्ही वाघांना इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. वाघ हा भयानक प्राण्यांपैकी एक आहे. त्याला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. त्याच्या समोर जाण्याचे कोणीही धाडस करत नाही. मात्र, सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओ काही अन्य कारणाने व्हायरल झाला आहे. Tiger, video, social media, users
या व्हायरल व्हिडिओमध्ये (टायगर व्हिडिओ) तरुणीचे धाडस पाहून तुमच्याही चकित व्हाल. या व्हिडीओत मुलगी जे काम करते, ते मोठ-मोठे लोकही करू शकत नाहीत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सचा डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. या व्हिडिओने आपल्या मुलीचेही कौतुक केले आहे.
https://www.instagram.com/reel/Cj9cq_zLy5b/?utm_source=ig_embed&ig_rid=b46c0641-9c89-4b8e-86ee-3f60c395499e
एक मुलगी आनंदाच्या भरात चक्क वाघाखाली झोपल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये मुलगी आनंदी दिसत आहे. या व्हिडीओमधील मुलीच्या हिमतीची दाद अनेकजण देत आहेत. प्रत्येक्षात वाघाला पाहून अनेकांच्या हृदयाचे धोके वाढतात.
दरम्यान, हा 10 सेकंदाचा व्हिडिओ टायगर बिगफॅन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकजण यावर वेगवेगळ्या कंमेंट करत आहे. अनेकजण महिलेच्या धाडसाचे कौतुक करत करत आहेत.
तिचा आणखी एक व्हिडीओ mokshabybee_tigers नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ही मुलगी अनेक साथीदारांसह व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. ज्यामध्ये ती सिंह, वाघ, चिंपांझी आणि बिबट्या तसेच हायनासोबत खेळताना दिसते. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नुकताच मुलीचा आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती वाघासोबत बोटीवर पोहताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये ती महिला एका लहान बोटीवर वाघासोबत बसलेली दिसत आहे, ज्या बोटीला पॅडलच्या मदतीने ती चालवत आहे. यादरम्यान वाघ बोटीवर पोटावर पडलेला दिसतो. या व्हिडिओलाही सोशल मीडियावर 2 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर यूजर्स सतत आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: के एल राहुलने उभ्या उभ्या मारला ९६ मीटरचा लांबलचक षटकार, कोहलीही झाला थक्क
VIDEO: ना हिंदू, ना मुसलमान, हा आमचा शाहरूख खान, चाहत्याचे बोलणे ऐकून शाहरूखने मारली मिठी
VIDEO: जड ओझं वाहून नेणाऱ्या हातगाडीला बसचालकाने अशी केली मदत, लोकांचं जिंकलं मन