देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर यायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या हाती यावेळेस बहुतेक अपयश येईल असे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले आहे.
इतकेच नव्हे तर, पंजाब राज्यात पुढचे मुख्यमंत्री भगवंत मान असतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यंदा काँग्रेसला ३० पर्यंतच जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु यात भाजपला पंजाब राज्यात कसलेच स्थान मिळालेले नाही.
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले आहे की, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हाती मोठे अपयश लागणार आहे. निवडणुकीत काँग्रेसला जवळपास 50 जागांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. फक्त 27 जागा मिळण्याची शक्यता काँग्रेसबदल व्यक्त करण्यात येत आहे.
याच्या उलट ‘आप’ला पंजाबमध्ये जास्त सीट मिळणार असल्याचे दिसत आहे. आप 70 जागांच्या जवळपास पोहचत राज्यात सत्ता काबीज करू शकतो. शिरोमणी अकाली दल सुद्धा 15 ते 17 जागांवर निवडून येईल. परंतु भाजपला २ ते ३ जागांवरच समाधान मानावे लागेल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये अनेक सभा भरविल्या होत्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला दिसून येत नाही. मोदींनी कृषी कायदे आणल्यामुळे पंजाबचे शेतकरी नाराज असलेले दिसून येत आहे.
याच्या उलट दिल्लीत शेतकरी आंदोलनाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे त्याचा फायदा आपला या निवडणुकीत होताना दिसत आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी यंदा आपच्या बाजूने कौल दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी फडणवीसांना द्यावी, नितेश राणेंची मागणी
काहींनी सांगितलं ‘मी येणार मी येणार,’ आम्ही काय येऊन देतो का? शरद पवारांचा फडणवीसांचा टोला
उत्तर प्रदेशात पुन्हा ‘योगींचीच’ची हवा; भाजपला ‘एवढ्या’ जागा मिळण्याचा एक्झीट पोलचा अंदाज
‘या आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू प्रेरणा ठरणारेस’; अभिनेत्याने केले नागराज मंजुळेंचे तोंडभरून कौतुक