Share

कतरिना का दिपीका? कार्तिक आर्यनसोबत ऍक्शन चित्रपटात झळकणार ए-लिस्टर अभिनेत्री

‘भूल भुलैया 2’च्या(Bhool Bhulaiya 2) यशानंतर कार्तिक आर्यन लवकरच कबीर खानसोबत एका चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. आता बातम्या येत आहेत की या चित्रपटात कार्तिकसोबत एक मोठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(the-a-lister-actress-will-be-seen-in-an-action-film-with-karthik-aaryan)

बॉलीवूडची(Bollywood) ए-लिस्टर अभिनेत्री कार्तिक आर्यनच्या चित्रपटात प्रवेश करू शकते आणि इंडस्ट्रीतील दोन टॉप अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांची नावे आघाडीवर आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रोजेक्टसाठी चित्रपट निर्माते दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आणि कतरिना कैफ या दोन मोठ्या कलाकारांच्या संपर्कात आहेत. असे वृत्त आहे की, निर्मात्यांना यापैकी एकीला कार्तिकसोबत चित्रपटात साईन करायचे आहे.

विशेष म्हणजे दीपिकाने यापूर्वीच कार्तिकसोबत(Kartik Aryan) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंडस्ट्रीत असेही बोलले जाते की, दीपिकाने कार्तिकसोबत एक चित्रपट साइन करून ठेवला होता. दुसरीकडे कतरिना कैफनेही(Katrina Kaif) कार्तिकसोबत एक चित्रपट साइन केला होता पण तो चित्रपट होऊ शकला नाही.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक स्ट्रीट फायटरची भूमिका साकारणार आहे. कार्तिकच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो येत्या काही दिवसांत शहजादामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत क्रिती सेननही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now