Share

याला म्हणतात देशप्रेम! बॅग अडकवून ८० वर्षांचे आजोबा निघाले युक्रेनच्या सैन्यात भरती व्हायला, पहा फोटो

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या काळात अनेक काळजाला चिमटा देणारे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. मध्यंतरीच युक्रेनमधील सबवे स्टेशनवर निरोप घेत असलेल्या जोडप्याचा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांनतर आता युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोला कॅटेरीना युश्चेन्को यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, सैन्यात भरती होण्यासाठी एका वृद्ध व्यक्ती बॅग घेऊन उभा आहे. त्याच्याकडे 2 टी-शर्ट, एक पॅंट, एक टूथब्रश आणि दुपारच्या जेवणासाठी काही सँडविच असल्याची माहिती कॅटेरीना युश्चेन्को यांनी दिली आहे.

कॅटेरीना यांनी म्हटले आहे की, हे सर्व ते त्याच्या नातवंडांसाठी करत होते. वृध्द व्यक्तीच्या या फोटोला अनेकांनी शेअर केले आहे. कॅटेरीना युश्चेन्को यांच्या पोस्टला तर 133k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. युध्द कोणत्याही देशात झाले तरी त्यात फक्त नागरीकांचेच हाल होतात. राशिया आणि युक्रेनच्या युध्दात हीच परीस्थिता निर्माण झाली आहे.

या दोन्ही देशात उद्भवलेल्या परिस्थितीचे फोटो सोशल मिडीयावर अनेकजण शेअर करत आहेत. या फोटोंमधून तेथील भिषण परिस्थिती लक्षात येते. दरम्यान आपल्या देशाला वाचविण्यासाठी युक्रेन नागरीक रस्तावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेनमध्ये असणाऱ्या अनेक रशियन गाड्या फोडल्या आहेत. रशियाने देखील थेट किव्हच्या इमारतींवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.

परंतु किव्हला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी युक्रेनचे सैन्य जीवाची बाजी लावत आहेत. राजधानी किव्हवर रशियाने हल्ला केल्यामुळे तेथील आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. रशियाने उचलेल्या या पावलामुळे युरोपमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दुसऱ्या बाजूला युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाने हल्ला केल्यामुळे अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. यासाठी अमेरिका आपल्याला पूर्ण मदत करेल असे आश्वासन अमेरिकेने झेलेन्स्की यांना दिले आहे. परंतु झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा सल्ला नामंजुर केला आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now