Share

46 वर्षीय अभिनेत्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक, दीड महिने करत होता अभिनेत्रीचे लैंगिक शोषण

मल्याळम चित्रपट अभिनेता आणि चित्रपट निर्माते विजय बाबू (Vijay Babu) याला एका अभिनेत्रीसोबत बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोमवारी या प्रकरणाचा तपास करत कोची शहर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, विजय बाबूने २२ जून रोजी केरळ उच्च न्यायालयातून जामीन घेतला होता. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्देशानुसार अटींच्या आधारे त्यांची जामिनावर सुटका होणार आहे.(Vijay Babu, Rape, High Court, Police Cell)

केरळ हायकोर्टाने विजय बाबूला जामीन देताना त्याला ५ लाख रुपये जामीन म्हणून जमा करावे लागतील आणि तेवढ्याच रकमेच्या दोन जामीनदार असावेत अशी अट घातली होती. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जाला परवानगी देताना असेही सांगितले होते की, तपासात सुलभता आणण्यासाठी विजय बाबूला २७ जून ते ३ जुलै दरम्यान पोलिस कोठडीत ठेवले जाईल आणि या कालावधीत पोलिसांना पुरावे गोळा करण्याची परवानगी दिली जाईल.

Vijay Babu The Actor-producer of Malayalam movies arrested in alleged rape case GGA

निर्माता विजयच्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीने २२ एप्रिल २०२२ रोजी पोलिस तक्रार दाखल केली आणि फेसबुक पोस्टद्वारे तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे तपशीलवार वर्णन केले. गेल्या दीड महिन्यांपासून विजय बाबूकडून शारीरिक आणि लैंगिक शोषण होत असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं.

Vijay Babu नशे की गोलियां खिलाकर करते थे रेप- viral news

पोलिस तक्रारीनंतर जेव्हा विजय बाबूने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला तेव्हा अभिनेत्रीच्या वकिलाने त्याला विरोध केला. वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला होता की, विजय बाबूने अभिनेत्रीने ठेवलेल्या विश्वासाचा गैरवापर केला आहे. नवीन कलाकार असल्याने तिच्या विरोधाला दुर्लक्ष करत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याचेही अभिनेत्रीच्या वतीने सांगण्यात आले.

दुसरीकडे विजय बाबूने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने आपल्याला बळीचा बकरा बनवले जात असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. कोची पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

४६ वर्षीय विजय बाबूने ‘सूरियम’, ‘थ्री किंग्स’, ‘हनी बी’, ‘एस्केप फ्रॉम युगांडा’, ‘लव कुश’ आणि ‘एटीन ऑवर्स’ यांसारख्या मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. तो ‘फिलिप अँड द मंकी पेन’ आणि ‘तमार पदार’ यांसारख्या मल्याळम चित्रपटांचा निर्माताही आहे.

महत्वाच्या बातम्या-
सलमानच्या विरोधात बोलल्यानंतर या गायिकेला आल्या होत्या बलात्काराच्या धमक्या, वाचून धक्का बसेल
राहुल जैन नाव सांगू २ वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिला अब्दुल वसीम, लग्नाचं वचन देऊन केला बलात्कार
प्रसिद्ध अभिनेत्रीला १३-१४ वर्षांच्या मुलांनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, धक्कादायक कारण आले समोर
वयाच्या 6 व्या वर्षी झाला बलात्कार, कुटुंबाने पॉर्न इंडस्ट्रीत ढकलले, हे काळे सत्य वाचून हादरून जाल

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now