फॉक्सकॉन(Foxconn): वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांमध्ये १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राकडे येणार होती. पण गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड झाली असल्याचे वेदांत ग्रुपने जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांत ग्रुपने महाराष्ट्राशी या प्रकल्पाबाबत चर्चा सुरु केली होती. सत्तांतरणानंतर जुलै महिन्यात वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या मंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती.
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्याने शिंदे – फडणवीस सरकारवर अनेकांकडून टीका केल्या जात आहे. आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनीही जोरदार टीका केलेली आहे. अशातच माजी उद्योगपती सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाबाबत एक खुलासा केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचा निर्णय जवळपास झाला होता, फक्त केंद्र सरकारचा होकार घ्यावा लागेल, असे वेदांत ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी सांगितले होते.
मग आता अचानक गुजरात मधात आले कसे? वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी फक्त तीनच राज्यात स्पर्धा होती. ते तीन राज्य म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक हे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा फॉक्सकॉनची गुंतवणूक महाराष्ट्रात यावी यासाठी चर्चा बैठक होत असे. तेव्हा तत्कालीन उद्योगमंत्री म्हणून सुभाष देसाईसुद्धा त्या चर्चेत सहभागी होते.
सुभाष देसाई यांनी टीकाही केली आहे. ते म्हणाले की, आपल्याविरोधात काही बोलू शकण्याची धमक महाराष्ट्रातील सरकारमध्ये नाही, अशी खात्री केंद्रातील भाजप सरकारला झाली आहे. म्हणून महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प पुन्हा एकदा गुजरातला पळवला. फॉक्सकॉन प्रकल्प तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या राज्याचा विचार आधी वेदांत ग्रुपने केला होता.
महाराष्ट्रातील पुणे शहर तंत्रज्ञान उद्योगात आघाडीवर आहे. त्यामुळे जवळपास हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची पूर्ण शक्यता होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि अचानक हा प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे जाहीर झाले. तीन राज्यात स्पर्धा असताना एकाएकी गुजरात आले कुठून?, असा प्रश्न सुभाष देसाई यांनी उपस्थित केला आहे.
दोन वेळा झालेल्या चर्चेत वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी म्हटले की, आमच्याकडून प्रकल्प महाराष्ट्रातच करणार, फक्त एकदा केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तेव्हाच महाविकास आघाडी सरकारला शंका आली होती की, आता प्रकल्प आपल्याला मिळणार की नाही. आमची शंका खरी ठरली आणि प्रकल्प गुजरातकडे गेला, असेही देसाई म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
shinde group : ४० गद्दारांनी शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ फावड्यांनी…; शिवसेनेची शिंदेगटाला जाहीर धमकी
Mumbai: मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने २२७ दवाखाने सुरु करणार, रुग्णांना मिळणार मोफत उपचार
Congress: अखेर काँग्रेस फुटलीच! माजी मुख्यमंत्र्यांसह तब्बल आठ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
Bhajpa: भाजप महाराष्ट्रातील आणखी एक मित्रपक्ष संपवणार? सहकारी पक्षाचा एकमेव आमदार फोडण्याच्या हालचाली