राजकारण (Politics): महाराष्ट्रातील सत्तांतरणानंतर राजकारणामध्ये अनेक बदल घडून आले सर्व पक्षांवर एकमेकांकडून टीका केल्या जात आहेत. त्यामुळे वातावरण सतत तापलेले असते. हनुमान चालिसा पठण करू दिली नाही म्हणून राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार पडले, ही तर सुरूवात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती.
त्यावर शिवसेनेने जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिती, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात. ती बाई आम्हाला हनुमान चालिसा शिकवती, आम्हाला शहाणपणा शिकवती? तिच्याविषयी आमच्याकडे बोलूच नका.
त्याचबरोबर शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी म्हणाल्या की, एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. नवनीत राणा जरा तोंड सांभाळून बोला. ‘सी’ ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री आहात तुम्ही. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांचं नाक कापू, अशी जबरदस्त टीका घडी त्यांनी नवनीत राणांवर केली आहे.
चालिसा पठनापासून नवनीत राणा आणि शिवसेना यांच्या मध्ये वाद सुरु आहे. त्या वादात आणखी भर पडताना दिसून येत आहे. हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर संजना घाडी म्हणाल्या की, भाजपाच्या सी, डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितले. तुम्ही थेट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला गेल्यात.
ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री, मंदिर आणि मशिदीतील फरक कळत नाही, त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती. हनुमान चालिसाशी आपला काय संबंध? हनुमानाला हनुमान का म्हटल्या जाते? याचे साधे उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आले नाही आणि म्हणे मी हनुमान भक्त असेही घाडी म्हणाल्या.
शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत आहे. तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई, महाराष्ट्रावर आपला भगवा मानाने फडकत ठेवणार असा विश्वास घाडी यांनी व्यक्त केला आहे. तुम्ही म्हणाल की सेनेचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाही, बाळासाहेबांचे विचार राहिले नाहीत.
पण मुंबईची मुलगी म्हणून तुम्हाला हे माहित असायला हवं होत की, याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची परवानगी दिली होती. त्यांनीदेखील बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केली होती. तेव्हा मुंबईची मुलगी कदाचित सी ग्रेड फिल्म करण्यात व्यस्त होती, असेही घाडी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
कॉंग्रेसला भलं मोठं भगदाड! अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार?, कॉंग्रेसच्या गोटात खळबळ
गुजरात नशेचे केंद्र, मुंद्रा बंदरातून अंमली पदार्थांची तस्करी, पण मोदी..; राहूल गांधींचे गंभीर आरोप
…तर मी राजीनामा देऊन टाकेन; तानाजी सावंत यांनी केलं जाहीर आव्हान, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
दसरा मेळावा कोणाचा शिंदे गट की ठाकरे गट? आठवलेंनी केला मोठा गौप्यस्फोट, सांगितलं ‘कारण’