महाराष्ट्र्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी न्यायाधीश कैलास चांदीवाल आयोगासमोर एक धक्कादायक दावा केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ ठेवलेल्या स्फोटकांबाबतची माहिती राज्य सरकारपासून का दडवून ठेवली, असे मी आणि तीन अतिरिक्त मुख्य सचिवांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारले असता ते थरथर कापत होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे वकील योगेश नायडू यांनी आयोगासमोर अनिल देशमुख यांची उलटतपासणी केली. यावेळी सचिन वाझेंच्या वकिलांनी अनिल देशमुख यांना बरेच प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देशमुखांनी हा दावा केला आहे. न्यायालयात या प्रकरणाबद्दल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.
“वाझे तुमच्या इतके जवळचे होते, तर मग त्यांनी तुम्हाला अंटालिया स्फोटकाप्रकरणी माहिती दिली नव्हती का, असे आम्ही परमबीर सिंग यांना विचारले होते. तेव्हा वाझेने काय केले, हे आपल्याला माहिती नसल्याचे परमबीर सिंग म्हणाले”, अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयात दिली.
अंटालिया स्फोटके प्रकरणाची चौकशी एटीएसकडे देण्याची मागणी मी तीन अधिकाऱ्यांसमोर केली होती. त्या मागणीला पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी विरोध केला, असा दावा देखील अनिल देशमुख यांनी न्यायालयात केला. ‘आम्ही एटीएसकडे तपास देण्याचा निर्णय ६ मार्च २०२१ रोजी घेतला होता. त्यानंतर ७ मार्चला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला’, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
विधानसभेत डी. सी. डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी मी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत. अंटालिया स्फोटकाप्रकरणा व्यतिरिक्त इतर प्रकरणांमध्ये त्यांच्याशी वैयक्तिक बोलल्याचे आपल्याला आठवत नाही, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयात सांगितले.
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक केली म्हणून सचिन वाझे यांच्यावर अंटालिया प्रकरणात खोटे आरोप लावण्यात आलेत, असे आपण विधानसभेत सांगितले होते का? असा प्रश्न वाझेंच्या वकिलांनी अनिल देशमुखांना केला. त्यावर उत्तर देताना देशमुख म्हणाले की, “अंटालिया स्फोटकाप्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. तेव्हा मी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन उद्या सांगेन, एवढेच म्हणालो होतो.”
महत्वाच्या बातम्या :-
डुग्गू सापडल्याच्या आनंदावर विरजण! आजच्या धक्कादायक घटनेने चव्हाण कुटूंबावर शोककळा
युकेमध्ये बदलणार इतिहास, भारतीय वंशाचा ‘हा’ व्यक्ती होणार पंतप्रधान? बोरिस यांची खुर्ची धोक्यात
क्रेडिट कार्डची लिमीट वाढवत असाल तर सावधान! रिकामे होऊ शकते पुर्ण खाते, जाणून घ्या