नुकताच राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला. संख्याबळ असताना देखील शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. सध्या राजकीय वर्तृळात त्याचीच चर्चा सुरू आहे. असे असताना दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे. छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार असा मजकूर या बँनरवर लिहीण्यात आला आहे.
संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. नुकतीच राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन शिवसेना आणि संभाजीराजे याच्यात चर्चा सुरू होत्या. संभाजीराजे यांनी त्यावेळी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेनेने त्यांची अपक्ष म्हणून अट अमान्य केली होती.
शिवसेनेने पक्ष प्रवेशाच्या घातलेल्या या अटीमुळे छत्रपती संभाजीराजे यांनी नकार दिला. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे भोसले यांनी शिवसेनेवर निशाणा साधणारे ट्वीट देखील केले. त्यामुळे संभाजीराजे शिवसेनेवर नाराज आहेत हे पक्के झाले.
राज्यसभेत शिवसेनेचा झालेला पराभव ही छत्रपती संभाजीराजे यांच्यासाठी चालून आलेली संधी आहे म्हणून संभाजीराजे यांच्या समर्थकांनी केलेली ही बँनरबाजी त्याचाच परिणाम असल्याचे बोलले जात आहे. बँनरमध्ये लिहीण्यात आले आहे की, शिवरायांचा गमिनी कावा वापरुन छत्रपतींचा अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे जाहीर आभार. त्याशिवाय, ‘राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य में २०२४ अभी बाकी है’
राज्यसभा निवडणूक निकालानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी संत तुकाराम यांचा अभंग ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी लिहीले होते की, वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा| परि नाहीं दशा साच अंगी| तुका म्हणे करीं लटिक्याचा साठा| फजित तो खोटा शीघ्र होय ||या ओळी ट्वीट करत छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
या ओळींचा अर्थ असा आहे की, वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसता, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते. आता संभाजीराजे याच्यांकडून टीकास्त्र सोडले जात असताना चिंता व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या विधानसभा परिषद निवडणुकीत याचा परिणाम शिवसेनेला भोगावा लागणार का ते पाहावं लागेल.