सध्या राजकीय वर्तुळात अनेक मुद्यांवरून राजकारण चांगलचं रंगलं आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप – प्रत्यारोपांचा जणू काही जंगी आखाडाच रंगला आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली.
अशातच शिवसेनेच्या गोटातून एक खळबळजनक बातमी समोर समोर येत आहे. शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामे दिले आहेत. यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर सेनेला जबर धक्का बसणार असल्याचं बोललं जातं आहे.
तर वाचा नेमकं घडलं काय? डोंबिवलीलगतच्या 27 गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेनं प्रशासकीय सोयीचे कारण पुढे करत डोंबिवली ग्रामीणचा समावेश डोंबिवली शहर शाखेत करण्याचे आदेश दिले. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी हे आदेश काढले आहेत.
या आदेशानंतर शिवसेनेत नाराजी नाट्यास सुरुवात झाली. लांडगे यांनी काढलेल्या आदेशानंतर ग्रामीणमधील तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राजीनामे दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सांगितले की, ‘या विभागाचा समावेश शहर शाखेत करून आमची गरज भासत नसेल तर यापुढे जाऊन राजीनामे मागण्याआधीच आम्ही राजीनामे देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याबाबत बोलताना लांडगे म्हणाले की, ‘प्रशासकीय कामासाठी हा भाग डोंबिवली शहर शाखेशी जोडण्याचा निर्णय ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी बोलूनच घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
..त्यावेळी मी स्टुडिओमध्ये उलटी साफ करायचे, रवीना टंडनचा वैयक्तिक आयु्ष्याबद्दल मोठा खुलासा
“मंगेशकर कुटुंबाने आज दाखवून दिलं, इज्जत माँगने से नहीं मिलती… कमानी पड़ती हैं!”
“दुसऱ्याच्या दारात हनुमान चालिसा म्हणण्यात देव नाही, तर राजकारण आहे”
उद्धवस्त ठरकीने..मुख्यमंत्र्यांवर टिका करताना अमृता फडणवीसांची भाषा पुन्हा घसरली