Share

उदयनराजेंना न घाबरता टक्कर देणारा, लाखात मते घेणारा ठाकरेंचा वाघ शिंदे गटात सामील

एक काळ होता..साताऱ्यात उदयनराजे यांना नडण्याची हिंमत कोणात नाही, असं बोललं जायचं. पण त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आव्हान देण्याची हिम्मत एका पठ्ठ्याने केली. या निवडणुकीत त्याचा पराभव झाला पण अख्ख्या महाराष्ट्राला हे नाव परिचयाचं झालं. ते साताऱ्याचे शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव. (Thackeray’s tiger, who fearlessly challenged Udayanraj and won lakhs of votes, joined the Shinde group)

पक्षाचा आधार असणारे अनेक ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जात असताना आता हा मोठा धक्का ठाकरेंना बसला आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना पक्षाकडून तिकीट मागितले होते. परंतु २०१४ ला लोकसभा निवडणुकीची ही जागा रिपाईसाठी सोडण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि थेट उदयनराजेंनाच आव्हान दिले. जाधवांचा पराभव झाला पण त्यामध्ये अडीच लाखांहून अधिक मतं त्यांना मिळाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

पण उदयनराजेंना नडणाऱ्या माणसाला त्याची किंमत मोजावीच लागते. त्याप्रमाणे वाई मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून पुरुषोत्तम जाधव उभे राहिले होते. परंतु त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला.

पक्षाकडून सतत नाकारले जाण्याची भावना, त्यांना वेळोवेळी डावलले जात होते या सगळ्यामुळे नाराज झालेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे.

२०२४ ला भाजपला आव्हान देण्यासाठी पुरुषोत्तम जाधव यांच्या रूपात उद्धव ठाकरेंची आशा जिवंत होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकत ठाकरेंची ही आशा पण धुळीस मिळवली आहे. त्याच पुरुषोत्तम जाधव यांना आपल्या गटात सामील करून भाजपचा पर्यायाने उदयनराजे भोसले यांचा मार्ग सोपा करून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
दानवेंनी वाढदिवसा दिवशीही उद्घव ठाकरेंना सोडले नाही, थेट एकेरीवर उतरत केली घणाघाती टिका
वीज बीलात सवलत, ५० हजारांचे अनुदान, अजूनही बरच काही..; शिंदे सरकारचे शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय
करण जोहरच्या ‘त्या’ प्रश्नावर लाजला विजय देवरकोंडा, म्हणाला, ‘नाही मी हे कधीच केलं नाही’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now