shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. एकनाथ शिदे यांच्या बंडाला यश मिळताच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटाला देखील पक्षांतराचा जबर धक्का बसला.
अनेकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केले. यामुळे ठाकरे गटात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. एवढंच नाही तर, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्ष देखील टोकाला गेल्याच पाहायला मिळात आहे. अशातच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे.
खरी शिवसेना कोणाची..? यावरून सध्या ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे ठाकरे गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा करून दिली. मात्र फॉरमॅट चुकल्याने अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी झाल्याच वृत्त समोर आलं आहे.
दिलासादायक बाब म्हणजे, अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी ठरली असली तरी देखील 8.5 लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला मोठं यश आलं आहे. मात्र एवढ यश मिळून देखील पदरी निशाणाच आल्याच आता पाहायला मिळत आहे. कारण, निवडणूक आयोगाने एक मोठी माहिती दिली आहे.
ठाकरे गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असल्याच बोलल जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..