Share

भाग्यवान आहेत ठाकरे, इतकी निष्ठावान माणसं त्यांच्या पदरी आहेत; बाहेरच्या पक्षातील ‘या’ नेत्याकडून कौतूक

राज्यात सध्या मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसाच्या पठणावरुन वाद सुरु आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठा गोंधळ झाला दरम्यान, मातोश्रीच्या बाहेर असलेल्या एका 92 वर्षीय आजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

या आजी शिवसैनिकांमधल्या एक होत्या. ज्या राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणा करत होत्या. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतली होती. सध्या या आजीबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील दखल घेतली आणि पोस्ट टाकत शिवसेनेचे कौतूक केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी गेले 2-3 दिवस मातोश्रीच्या बाहेर तुफान गर्दी होती. त्या गर्दीत एक 92 वर्षाची म्हातारी आजी देखिल उभी होती. तीचे वय बघितले तर ती त्या गर्दीत काय करत होती. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल.

पण ह्यालाच म्हणतात निष्ठा! शिवसेनेची सर्वात मोठी ताकद. भाग्यवान आहेत ठाकरे कुटुंबीय. कि इतकी निष्ठावान माणसं त्यांच्या पदरात आहेत. आजकालच्या जगात तळहातावरच्या फोडासारखे जपलेली लोक ही कधी पाठीत खंजीर खुपसतील हे सांगता येत नाही.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1518199573449252865?t=7oLzu4Q97UJsS0KDZVv-9w&s=19

मी त्या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार व त्यांच्या पाया पडणार. कि अशीच निष्ठा माझ्या हृदयी राहो. हे भाग्य फक्त बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्यांच्या नशिबी आहे . शेवटी विरोधकांना प्रत्यक्षपणे नाव न घेता टोला देत म्हटलं की, निष्ठेचा आता बाजार झाला आहे.

या 92 वर्षांच्या आजीबद्दल अधिक माहिती म्हणजे, जेव्हा राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक यांच्यात गोंधळ झाला, तेव्हा मातोश्री बाहेर एक शिवसैनिक म्हणून या उभा होत्या. त्या राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी मातोश्रीच्या बाहेर थांबल्या होत्या. माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची दखल घेतली होती.

आजी राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी मातोश्रीच्या बाहेर थांबल्या होत्या. त्यामुळे याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी आजींची विचारपूस केली. एवढंच नाही, तर आजी काळजी घ्या, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

92 वर्षे वय असणाऱ्या आजीचे नाव चंद्रभागा असे आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न केल्यानंतर त्या म्हटल्या, राणा आलेत, ते मातोश्रीवर येऊन आमच्या वहिनींना त्रास देतायत, म्हणून आम्ही त्यांना इंगा दाखवणार आहोत. तुमची हिंमत कशी झाली? आमच्या साहेबांवर आलेलं संकट आम्ही दूर करणार, साहेबांसाठी आम्ही झटणार. राणांना वाटत असेल दोन्ही जण गुपचूप जाऊ पण आम्ही भिणार नाही, असे त्या आजीनं म्हटलं होतं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now