Share

Udddhav thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वच्या सर्व जागा जिंकत केला भाजप शिंदे गटाचा सुपडा साफ; पहा कुठे घडला हा चमत्कार

uddhav thackeray eknath shinde

Udddhav thackeray group shivsena win against bjp in gharapuri  | सध्या राज्यातील अनेक गावांमध्ये निवडणूका होतान दिसून येत आहे. शिंदेंच्या बंडखोरीचा परीणामही त्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांवर पडताना दिसून येत आहे. शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येताना दिसून येत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंच बळीराम ठाकूर सेना व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांमुळे ते पुन्हा एकदा विजयी झाले आहे. त्यांच्यापुढे स्थानिक नेतेही हातबल झाल्याचे दिसून आले. निवडणूकीत त्यांच्याविरोधात एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचपदासह आठही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत घारापुरी ग्रामपंचातीवर बिनविरोध भगवा फडकला आहे.

बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे ठाकरे गटातील नेतेही जल्लोषात आपला विजय साजरा करताना दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्यापासून घारापुरी ग्रामपंचायतीत उतरण्याची तयारी भाजप आमदार महेश बालदी, माजी सरपंच राजेंद्र पडते, यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थकांनी केली होती.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केली होती. तसेच उमेदवारांची चाचपणी सुद्धा ते करत होते. पण कोरोनाची दोन वर्षे वगळता सरपंच बळीराम ठाकूर यांनी मोठ्या प्रमाणात गावातील कामे केली होती. त्यामुळे त्यांच्या विकासकामांमुळे भाजप नेतेही हातबल झाल्याचे दिसून आले.

शिवसेनेच्या उमेदवारापुढे आपल्याला जिंकता येणार नसल्याचे भाजपच्या लक्षात आले होते. त्यामुळे भाजपने तयार केलेल्या एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

त्यामुळे आता घारापुरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेनेचे आठही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यानंतर आठही सदस्यांनी जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांची भेट घेतली आहे. या बिनविरोध निवडणूकीमुळे भाजपच्या महेश बालदी यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-
अवघ्या १९ वर्षांच्या मुलीने पुर्ण केला NASA चा खडतर प्रोग्राम; ठरली असा पराक्रम करणारी पहिली भारतीय
akshaya deodhar : प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट..; लग्नात पाठकबाईंनी घेतला भलामोठा उखाना, पहा व्हिडीओ
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदर जन्मापासूनच आहे बहिरा, ‘या’ कारणामुळे पडले वॉशिंग्टन नाव; आता मोडला कपिल देवचा रेकॉर्ड

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now