Share

निवडणूक आयोगात ऐनवेळी ठाकरेंचा घात करणाऱ्या ‘त्या’ दोन खासदारांची नावे आली समोर; वाचून धक्का बसेल

Uddhav Thackeray

शुक्रवारी निवडणूक आयोगाने ठाकरेंना धक्का देणारा निर्णय दिला आहे. त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाने ७८ पानांचा निकाल दिला आहे. या ७८ पानांंमध्ये संपुर्ण निकालाबाबत सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने शपथपत्रावरुन आणि शिवसेनेच्या घटनेवरुन हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. निर्णयासाठी ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात शपथपत्रे देण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार आणि खासदार कुणाकडे जास्त हा महत्वाचा मुद्दा ठरला.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५५ पैकी ४० आमदार आहे. तसेच शिवसेनेचे १३ खासदारही त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे आपणच खरी शिवसेना असल्याचे एकनाथ शिंदेंनी दावा केला होता. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे १५ आमदार आणि ६ लोकसभेचे खासदार असल्याचे म्हटले होते.

अशात हैराण करणारी माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाला १५ आमदार आणि ४ खासदारांनीच शपथपत्र दिले आहे. म्हणजेच शपथपत्र देतानाही दोन खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचे दिसले. त्यांची नावेही आता समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने जेव्हा शपथपत्र मागितले तेव्हा गजानन किर्तीकर आणि संजय जाधव यांनी शपथपत्रे दिली नाही. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच दोघांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे ४ खासदार आहे. तर १५ आमदार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने निकाल देताना काही गंभीर आरोप केले आहे. २०१३ आणि २०१८ मध्ये शिवसेनेच्या काही घटनांमध्ये बदल करण्यात आले होते. ते लोकशाहीला धरुन नव्हते. पक्षामध्ये निवडणूका होणं गरजेचं असते. पण शिवसेनेत नेमणूका झाल्या. हे बदल निवडणूक आयोगाला कळवले नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
बाद नसतानाही विराटला बाद देणाऱ्या अंपायरची कारकिर्द २४ तासांतच संपली; वाचा नक्की काय घडलं
शिवसेनेची संपत्ती, कार्यालय, निधी यावर कोणाचा हक्क शिंदे गट की ठाकरे गट? कायदेतज्ज्ञ म्हणाले…
शरद पवारांनी एका वाक्यातच काढली निवडणूक आयोगाच्या निकालाची हवा अन् वाढले भाजपचे टेंशन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now