Share

ठाकरे सरकारचा काउंटडाऊन सुरू; नारायण राणेंनी सरकार कोसळण्याची दिली नवी तारीख, म्हणाले…

राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार अशी भविष्यवाणी विरोधी पक्ष नेहमी करतात. सध्या राज्यात मनसे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता एक नवी भविष्यवाणी केली आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध नारायण राणे हा वाद महाराष्ट्र राजकारणात सध्या थांबण्याचे नाव घेत नाही. नारायण राणे नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्यांवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधतात. महाविकास आघाडी लवकरच कोसळणार अशी भविष्यवाणी ते नेहमीच करत असतात.

महाराष्ट्रात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी ठाकरे सरकार कोसळण्याची तारीख जाहीर केली आहे. जून महिन्याआधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरुन जातील, अशी भविष्यवाणी नारायण राणेंनी केली आहे.

मनसे विरुद्ध महाराष्ट्र सरकार वाद पाहता, सध्या भाजप-मनसे युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा कथित भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी भाजपच्या पोलखोल अभियानाची सुरुवात झाली आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. अशा तापलेल्या वातावरणात सरकार पडण्याची नवी तारीख नारायण राणेंनी जाहीर केली आहे.

नारायण राणे म्हणाले, आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळं येतात. या वादळात हलणारी झाडं फांद्यासकट कोसळून पडतात. त्याच प्रकारे राज्यात तीन पक्षांचं एक झाड आहे. त्या झाडाच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत. ते खोडावर नाहीयेत. ते जून महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्रिपदावरुन जाणार.

नारायण राणेंच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले की, गेली 50 वर्ष शिवसेना वादळाशी संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेसाठी वादळं नवीन नाहीत. वादळं परतून लावण्याची आणि नवीन वादळं निर्माण करण्याची शिवसेनेची क्षमता महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त शिवसेनेमध्येच आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now