Share

ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा- उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. मुख्य उध्दव ठाकरेंनी याच पार्श्वभूमीवर आज बंडखोरी करणाऱ्यांना ठाकरी भाषेत चॅलेंज केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून महाराष्ट्र राजकारणात रोज काहीना काही नवीन घडत आहे. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळते आहे. आज मुख्यमंत्री यांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांना आव्हान केलं. त्यांनी ठाकरी भाषेत त्यांना चॅलेंज दिलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या बाळासाहेबांनी आणि शिवसेनेनं तुम्हाला दिलं आज तुम्ही त्यांच्यासोबत गद्दारी करत आहात. ठाकरे आणि शिवसेना नाव न घेता तुम्ही जगून दाखवा. ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही.

तसेच म्हणाले, मी शांत आहे पण षंढ नाही. ज्यांची स्वप्नं होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. सेनेची मूळं आज माझ्यासोबत आहेत. झाडाच्या फांद्या, फुलं, फळं न्या, पण तुम्ही मूळं नेऊ शकत नाही.

मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो. कोण कसं वागलं यात जायचं नाही. बंडखोरांकडे शिवसेना फोडण्याचं पाप, माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं राक्षसी महत्वाकांक्षा एकनाथ शिंदेसाठी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती दिली. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना जे आव्हान केलं, त्यावरून ठाकरेंचा संयमाचा बांद फुटला असेच म्हणावे लागेल. उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना केलेल्या आव्हानामुळे आता पुढे बंडखोरांकडून कोणते पाऊल उचलले जाते पाहावं लागेल.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now