Share

ठाकरे आक्रमक! भाजप आणि मनसेवर तुटून पडा; मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आदेश

गेल्या काही दिवसांपासून  राणा, किरीट सोमय्या हल्ला प्रकरण संपत नाही. तोच आता राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. ३ मे रोजी मशीदींवरील भोंग्यांवरून आव्हान दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.

राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज  सेनेची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.शिवसेना खासदारांच्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही  शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास बैठक झाली होती. या बैठकीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .

या बैठकीला सेनेचे नेते, प्रवक्ते आणि खासदार उपस्थित आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या  या  बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कधी नव्हे तो थेट राज ठाकरेंवर टीका केली आहे.

मुखमंत्री म्हणाले,
भाजपा आणि मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपा, मनसेवर तुटून पडा, असे आदेशच ठाकरे यांनी  बैठकीत कार्यकर्त्यांना दिले आहेत. बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?  मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचे काय सुरु होते ? असा सवालही राज यांच्या बदललेत्या भूमिकेवर त्यांनी  उपस्थित केला. 

आपली कामं लोकापर्यंत पोहोचवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेना भवनातून ते ॲानलाईन मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे इतर नेते ही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

आजच्या बैठकीचे वैशिष्ट्य
आजच्या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात न दिसलेल्या खासदार भावना गवळी देखील या बैठकीला उपस्थित होत्या .
महत्वाच्या बातम्या
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्वच मनसेचा वापर करत आहे”
महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ – राज ठाकरे कडाडले
…तर भारतात श्रीलंकेसारखी परिस्थीती ओढवेल, याचं भानं केंद्राने ठेवावं; रोहीत पवारांचा घणाघात
जेव्हा बहिणीच्या मृत्युदिवशीच जॉनी लिव्हर यांना करावी लागली होती कॉमेडी, किस्सा वाचून व्हाल भावूक   

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now