Share

भारताला २०४७ पर्यंत मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा होता इरादा; बिहारमधून २ दहशतवाद्यांना अटक

बिहारची राजधानी पाटणामधून पोलिसांनी देशविरोधी, विघातक कारवाया करणाऱ्या २ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली देशविरोधी दहशतवादी कारवयांचे प्रशिक्षण शिबिर हे २ दहशतवादी चालवत होते. विशिष्ट समुदायातील तरुणांना भडकवून या शिबिरात सामील करून घेतले जात होते. (terrorist training classes under the guise of martial arts training; In Bihar)

फुलवारीशरीफच्या ‘नया टोला’ भागात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनांच्या नावाखाली देश विघातक कारवायांचे षडयंत्र रचले जात होते. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २ दहशतवाद्यांना पीएफआयच्या ऑफिसवर छापा टाकत अटक केली.

मोहम्मद जलालुद्दीन आणि अतहर परवेज अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मोहम्मद जलालुद्दीन हा झारखंड पोलीसमधला निवृत्त अधिकारी आहे. तर अतहर परवेज देशविरोधी कारवयांसाठी काम करणारी सिमी संघटना ज्यावर बंदी घालण्यात आली होती. त्या संघटनेचा सदस्य होता. त्यानंतर तो पीएफआय आणि एसडीपीआयमध्ये काम करायला लागला.

विविध राज्यांतून विशिष्ट समुदायातील तरुणांना भडकवून, त्यांना बिहारमधील या प्रशिक्षण केंद्रावर बोलावले जात होते. त्यासाठी मोठ्या हुशारीने त्यांची रेल्वे तिकिटे बनावट नावाने तयार केली जात. बिहारमध्ये पोहोचल्यावर त्या नावाची खोटी कागदपत्रे बनवून दिली जात.

त्याच बनावट नावांनी हॉटेलचे बुकिंग पण केले जायचे. पुढे त्यांना प्रशिक्षण केंद्रावर घेऊन येत शस्त्रास्त्र चालवण्यासोबतच, केंद्र सरकारच्या तथाकथित अन्यायाच्या कहाण्या सांगून ब्रेनवॉशिंग केले जात. या कामासाठी पाकिस्तान, बांगलादेशमधून हवालाद्वारे त्यांना पैसे पुरवले जात होते.

त्यांच्याकडे देश विघातक साहित्य आणि काही कागदपत्रे आढळली. त्यात ८ पानी व्हिजन डॉक्युमेंटचा देखील समावेश आहे. या डॉक्युमेंटमध्ये २०४७ पर्यंत भारत हे मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा उद्देश आहे. तसेच १०% मुस्लिमांनी एकत्र आले. तर घाबरलेल्या बहुसंख्यांक लोकांना गुडघे टेकायला लागू शकते, असे स्पष्ट लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या-
”दोन आठवडे झाले राज्याला कृषीमंत्री नाही, पेट्रोलचे दर कमी करुन काही उपकार केले नाही”
सुशांत मृत्यू प्रकरण पुन्हा तापणार, आता बहिणीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली, मी त्याची रूम…
मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भाजपकडून आमदारांना पैशांचं आमिष, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या क्राईम राजकारण

Join WhatsApp

Join Now