Share

अक्षयकुमारच्या पृथ्वीराजचा भयंकर अपमान; प्रेक्षकच नसल्याने शो झाले रद्द

अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झालेला दिसत आहे. या चित्रपटाचं बॉक्सऑफिस कलेक्शन खूपच कमी झालं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पाच दिवसानंतरही या चित्रपटाने ५० करोड देखील पार केले नाहीत. यामुळे आता या सिनेमाचे शो रद्द करण्यात आले आहेत.

वीकेन्डला चित्रपटानं थोडा चांगला बिझनेस केला तेव्हा वाटलं होतं बॉक्सऑफिसवर कदाचित सिनेमा पुन्हा आपली पकड घट्ट करेल, परंतु अपेक्षा भंग झाला. अक्षयच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सम्राट पृथ्वीराजचं पाचव्या दिवशीचं कलेक्शन तर फारच कमी राहिलं आहे.

चित्रपटाने पाचव्या दिवशी म्हणजे ७ जून रोजी फक्त ४.४० करोडचा बिझनेस केला. सिनेमाचं टोटल कलेक्शन हे केवळ ४८.८० करोड इतकं झालं. म्हणजेच या चित्रपटाने पाच दिवसात ५० करोडचा देखील टप्पा पार केला नाही. बॉक्सऑफिसवर सिनेमा चांगलाच आपटला.

अनेक सिनेमागृहात चित्रपटाच्या शो ला लोकच आली नाहीत. माहितीनुसार, चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटाच्या सकाळच्या शोला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली नाही. म्हणून आयत्या वेळेस शो कॅन्सल करण्यात आले आहेत.

चित्रपटाने आत्तापर्यंत केलेल्या कमाईवर नजर टाकली तर, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अक्षयच्या या चित्रपटाने १०.७० करोडची कमा केली होती. चित्रपटाचा पहिला वीकेन्ड चांगला होता. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १२.७५ करोड आणि तिसऱ्या दिवशी १६ करोडची कमाई केली होती. पण चौथ्या-पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये खूपच तोटा पहायला मिळाला.

एवढा अवाढव्य खर्च करून,भव्यदिव्य सेट, आणि जबरदस्त प्रमोशन करून देखील या चित्रपटाला जबरदस्त फटका बसला. अभिनेत्री मानुषी छिल्लरचा तर हा पहिलाच चित्रपट होता. ३०० करोडच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now