राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच लोकसभेत भाजपाचे बंगळुरूमधील खासदार तेजस्वी सूर्या (tejasvi surya) यांच्यावर टीका केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत तेजस्वी सूर्या यांनी केलेल्या घरानेशाहीच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी सूर्या यांच्यावर निशाणा साधला आहे. (tejasvi surya vs ncp supriya sule clashes on dynastic politics)
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशातील बेरोजगारीच्या विषयावर बोलताना तेजस्वी सूर्या म्हणाले की, “देशात सध्या बेरोजगारीचा प्रश्न नाही आणि देशात जर कोणी बेरोजगार असेल तर ते काँग्रेस पक्षाचे प्रिन्स राहुल गांधी हे आहेत.” अशी टीका करताना तेजस्वी सूर्या यांनी कॉंग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला.
यालाच प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी सूर्या यांना लक्ष केले. ‘तेजस्वी सूर्या हे काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात, तर मग कर्नाटकातील आमदार रवी सुब्रमण्य यांच्याशी तेजस्वी सूर्यांचा काय संबंध आहे याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
घरानेशाहीच्या मुद्यावरुन यावेळी तेजस्वी सूर्या आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपचे खासदार आणि भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे कर्नाटकातील भाजपचे आमदार रवी सुब्रमण्यम यांचे पुतणे आहेत.
दरम्यान, दिल्लीत पत्रकारांशी बोलताना तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधींच्या परराष्ट्र धोरणाविषयीच्या भूमिकेवर टीका केली. “राहुल गांधींचं परराष्ट्र धोरणाविषयीचं ज्ञान हे फक्त त्यांच्या विदेशात जाणाऱ्या सुट्टीपुरतंच मर्यादित आहे. केंद्र सरकारला परराष्ट्र धोरणाविषयी सल्ला देण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही”, असं तेजस्वी सूर्या म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर निशाणा साधला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण दिवाळखोरीचं आहे. त्यामुळे मोदी भारताला संकटात टाकत आहेत. सध्याचं केंद्रातलं सरकार पाकिस्तान आणि चीनला एकत्र येण्याची संधी देत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
‘आई कुठे काय करते?’ मधील अनिरूद्ध देशमुखच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलात का?
राज्यात आणखी एक घोटाळा उघड, एवढ्या जणांनी तलवारबाजीचे बोगस प्रमाणपत्र दाखवून मिळवली पोलिसांत नोकरी
रवि तेजाच्या चित्रपटाने रिलीजच्या आधीच घातला धुमाकूळ, प्री-बुकींगमध्ये कमावला बक्कळ पैसा
शेअर बाजार उघडताच गुंतवणुकदारांचे अडीच लाख कोटी बुडाले, पण अदानी विल्मरचा जलवा सुरूच